शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्याला फडणवीस,अजित पवारांचा विरोध होता"
2
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
3
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
4
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
5
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
6
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
7
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
8
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
9
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
10
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
11
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
12
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
13
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
14
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
15
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
16
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
17
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
18
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
19
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
20
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 

दुसऱ्याच दिवशी स्वयंचलित जिना सरकेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2019 1:15 AM

रेल्वे स्थानकावर सुरू झालेला स्वयंचलित जिना दुसऱ्याच दिवशी बंद ठेवण्याची पाळी रेल्वे प्रशासनावर आली. खोडसाळपणा करणाऱ्या काही मुलांनी आपत्कालीन स्थितीत जिना बंद करण्याचे बटन आठ ते दहा वेळा दाबल्याची माहिती मिळाली. याचा घसरगुंडी म्हणूनदेखील वापर त्यांच्याकडून करण्यात आला.

ठळक मुद्देघसरगुंडी म्हणून वापर : आॅपरेटिंगसाठी कर्मचारीच नाही

श्यामकांत सहस्त्रभोजने ।लोकमत न्यूज नेटवर्कबडनेरा : रेल्वे स्थानकावर सुरू झालेला स्वयंचलित जिना दुसऱ्याच दिवशी बंद ठेवण्याची पाळी रेल्वे प्रशासनावर आली. खोडसाळपणा करणाऱ्या काही मुलांनी आपत्कालीन स्थितीत जिना बंद करण्याचे बटन आठ ते दहा वेळा दाबल्याची माहिती मिळाली. याचा घसरगुंडी म्हणूनदेखील वापर त्यांच्याकडून करण्यात आला.मध्य रेल्वे भुसावळ विभागाचे प्रबंधक विवेककुमार गुप्ता व खासदार नवनीत राणा यांच्या हस्ते ११ आॅगस्ट रोजी स्वयंचलित जिन्याचे रीतसर उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर प्रवाशांच्या वापरासाठी तो खुला झाला. मात्र, दुसऱ्याच दिवशी सकाळपासून ते दुपारपर्यंत स्वयंचलित जिना काही खोडसाळ मुलांनी आठ ते दहावेळा बंद केल्याची माहिती रेल्वे सूत्रांकडून मिळाली. यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून रेल्वे प्रशासनाला जिना बंद ठेवावा लागला.बंद जिन्याचा काही मुलांनी घसरगुंडी म्हणूनदेखील वापर केला. या जिन्याहून सध्या चढता येते, मात्र उतरता येत नाही. स्वयंचलित जिन्यावरून उतरू नये, या आशयाचे फलकच तेथे लावण्यात आले आहे.जिना चुकीच्या ठिकाणी?जिना नव्या पादचारी पुलाला जोडण्यात आला. मात्र, या पुलावरून प्रवाशांची गर्दी कमी असते. जुन्या पादचारी पुलालगत तिकीट बूकिंग कार्यालय आहे. याच पुलाजवळ स्वयंचलित जिना बसवायला पाहिजे होता, अशा प्रतिक्रिया प्रवाशांनी व्यक्त केल्या. तिकीट काढल्यानंतर वृद्ध प्रवाशांना येथून बरेच दूरपर्यंत चालत जाऊन जिना चढावा लागतो. यामुळे तो चुकीच्या ठिकाणी लावल्याचा आक्षेपही प्रवाशांनी घेतला आहे.कर्मचारी तैनात करा, प्रवाशांची मागणीस्वयंचलित जिन्यावरून नवलाई म्हणून परिसरातील काही मुले चढण्यासाठी गर्दी करीत होते. त्याचा मनस्ताप प्रवाशांना सहन करावा लागला. अंगवळणी पडेपर्यंत या जिन्याच्या ठिकाणी कर्मचारी नेमणे अत्यंत गरजेचे आहे. तशी मागणीच तोंडी स्वरूपात प्रवाशांंची होती. जिना जेवढा कामाचा, तेवढाच धोकादायक ठरू शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात आली.इंटेरिअर डेकोरेशनला पडले भगदाडजिन्याच्या आजूबाजूला असणारे इंटेरियर डेकोरेशनला पहिल्याच दिवशी भगदाड पडले. ते कशामुळे पडले, हे मात्र समजू शकले नाही.

टॅग्स :railwayरेल्वे