नवीन तुरीच्या दरात पहिल्यांदा वाढ; आठ दिवसांत भाव एक हजाराने वाढले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 14:10 IST2025-01-20T14:10:12+5:302025-01-20T14:10:57+5:30

Amravati : महिनाअखेरिस वाढेल आवक

New Turi price hiked for the first time; Price increased by 1,000 in eight days | नवीन तुरीच्या दरात पहिल्यांदा वाढ; आठ दिवसांत भाव एक हजाराने वाढले

New Turi price hiked for the first time; Price increased by 1,000 in eight days

लोकमत न्यूज नेटवर्क 
अमरावती :
हंगामाचे पार्श्वभूमीवर तुरीच्या दरात सात हजारांपर्यंत घसरण झाली होती. त्यातच नाफेडची खरेदीदेखील सुरू झाली नाही व बाजार समित्यांमध्ये हमीभावदेखील मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आले होते. आता शनिवारी ८ हजार रुपये क्विंटल असा दर मिळाला आहे.


यंदा तुरीचे उताऱ्यात कमी येत आहे. जुलै ते ऑक्टोबरदरम्यान सरासरीपेक्षा जास्त पाऊस व अतिवृष्टीमुळे तुरीचे पीक पिवळे पडले होते. बुरशीजन्य 'मर' रोगाचा अटॅक झाल्याने तुरीचे झाडे अनेक भागांत जाग्यावर करपली होती. 


तूरडाळीच्या दरात घसरण 
वर्षभर तुरीचे दर १० हजार रुपये क्विंटलवर असल्याने तुरीची डाळदेखील १६० ते १७० रुपये किलोच्या दरम्यान राहिली. आता महिनाभरापासून तुरीचे दर ७००० ते ७५०० रुपये क्विंटलच्या दरम्यान असल्याने डाळीचे दरदेखील १५० रुपयांच्या आत आलेले आहे. सध्या तूरडाळीचे दर १४० रुपये किलो असे आहेत.


तुरीच्या उताऱ्यात होत आहे घट 
उताऱ्यात घट येत असल्याने व सर्वत्र हीच स्थिती असल्याने मागणी वाढून तुरीला गतवर्षी प्रमाणेच उच्चांकी भाव मिळेल, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. प्रत्यक्षात हंगामाचे महिनाभरापूर्वीच तुरीचे भाव सात हजार रुपये क्विंटलवर पोहोचले. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. आता पुन्हा आठ हजारांवर भाव आलेले आहेत. 


तूर उताऱ्यात घट 
यावर्षी प्रतिकूल वातावरणामुळे तुरीच्या उत्पादनात कमी येत आहे. हलक्या प्रतवारीच्या शेतामधील तूर काढणी सुरु झालेली आहे व यावेळी उताऱ्यात कमी येत आहे.


तुरीचे बाजारभाव (रु/क्विं) 
०६ जानेवारी ७१५० ते ७५५१ 
०८ जानेवारी ७१५० ते ७४५१ 
१० जानेवारी ७२५० ते ७७७७ 
१३ जानेवारी ७००० ते ७११२ 
१५ जानेवारी ६८०० ते ७२०० 
१७ जानेवारी ७००० ते ७६०० 
१८ जानेवारी ६७५० ते ८०७०

Web Title: New Turi price hiked for the first time; Price increased by 1,000 in eight days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.