डीटीएडला नवा लूक 'डिप्लोमा इन इलिमेंटरी एज्युकेशन'
By Admin | Updated: May 10, 2015 00:39 IST2015-05-10T00:39:17+5:302015-05-10T00:39:17+5:30
डी.एड. व बी.एड.च्या सध्याच्या स्थितीबाबत महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद यांचे संशोधन सुरू आहे.

डीटीएडला नवा लूक 'डिप्लोमा इन इलिमेंटरी एज्युकेशन'
विद्यार्थ्यांचा ओढा वाढणार : अभ्यासक्रमातील बदल स्वागतार्ह
जितेंद्र दखने अमरावती
डी.एड. व बी.एड.च्या सध्याच्या स्थितीबाबत महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद यांचे संशोधन सुरू आहे. त्याचा घसरता आलेख सुधारण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येणार आहेत.
राज्यातील शिक्षणशास्त्र पदविका अभ्यासक्रम डीटीएड आता डिप्लोमा इन इलिमेंटरी एज्युकेशन (डीएलएड) नावाने ओळखला जाणार आहे. हा अभ्यासक्रम येत्या शैक्षणिक वर्षापासून बदलण्यात येणार असून त्याचा आराखडादेखील महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या वेबसाईटवर जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे डीटीएडला प्रवेश घेणाऱ्यांची संख्या वाढणार, का याबाबत संस्थाचालकांमध्ये उत्सुकता आहे. दिवसेंदिवस डीटीएडला प्रवेश घेणाऱ्यांची संख्या कमी होत असून त्याची विद्यार्थ्यांमध्ये क्रेझही कमी होत आहे.
या अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयाची वाढलेली संख्या व घसरलेला दर्जा यावर सातत्याने टीका केली जाते. त्यातच आता एनसीएफटीई २००९ व एसीटीई रेग्युलेशन सन २०१४ मधील मार्गदर्शक सूचनेनुसार महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने प्राथमिक शिक्षण पदविका अभ्यासक्रम डीएलईडी पुनर्रचित केलेला आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा या अभ्यासक्रमाकडे ओढा वाढणार असल्याची सुचिन्हे आहेत. त्यामुळे हा बदल लाभदायक ठरण्याचे संकेत आहेत.
असा असेल आराखडा
नव्याने प्रात्यक्षिके, प्रत्यक्ष कामाला प्राधान्य देणे, विद्यार्थ्यांना २० आठवडे शाळांमध्ये प्रत्यक्ष काम करणे अशा काही मुद्यांचा समावेश आराखड्यात करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना एटीकेटी असावी का? पदविका अभ्यासक्रमातही सेमी इंग्रजी सुरू करावे का? कार्यानुभव, कला, शारीरिक शिक्षण या विषयांची परीक्षा महाविद्यालय स्तरावर न ठेवता ती परिषदेकडून घेण्यात यावी का? याबाबत परिषदेने अभिप्राय मागविले आहे. परिषदेच्या ६६६.ेीूी१३.ङ्म१ॅ.्रल्ल या वेबसाईटवर नवीन आराखडा प्रसिद्ध करण्यात आला असून त्यावर अभिप्राय मागविण्यात येत आहेत.
पदविकेसाठीही श्रेयांक
नव्या आराखड्यानुसार माहिती तंत्रज्ञान हा स्वतंत्र विषय न ठेवता नियमित विषय शिकविताना माहिती तंत्रज्ञनाचा वापर कसा करावा हे शिकविण्यात येणार आहे. या आराखड्यानुसार आता पदविका अभ्यासक्रमासाठीही श्रेयांक पद्धत लागू होण्याची शक्यता आहे.
डीएडची क्रेझ पूर्वी खूप होती. त्यावेळी प्रवेशासाठी स्पर्धाही मोठ्या प्रमाणात होती. बदलत्या परिस्थितीनुसार यात बदल आवश्यक होते. त्यानुसार संशोधन परिषद स्तरावर यासंदर्भात कारवाई सुरू आहे. यामुळे या अभ्यासक्रमाची क्रेझ वाढण्यास नक्कीच फायदा होईल.
- श्रीराम पानझाडे,
प्राथमिक शिक्षणाधिकारी.