शहरं
Join us  
Trending Stories
1
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
2
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
3
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
4
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
5
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

नवे संकट : सिंचन महागणार, १० टक्क्यांनी वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2018 3:04 PM

स्थानिक स्वराज्य संस्था वगळता कृषीसह व्यावसायिक  वापरासाठी जलसंपदा विभागाने पाण्याची दरवाढ प्रस्तावित केली आहे.

गजानन मोहोड/ अमरावती : स्थानिक स्वराज्य संस्था वगळता कृषीसह व्यावसायिक  वापरासाठी जलसंपदा विभागाने पाण्याची दरवाढ प्रस्तावित केली आहे. यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस असल्याने कृषी सिंचनासाठी पाण्याची दरवाढ होणार असल्याने रबी हंगामापूर्वीच शेतक-यांसमोर नवे संकट उभे ठाकले आहे. यापूर्वीदेखील २०१० ते २०१३ व २०१३ ते २०१६ या कालावधीसाठी पाणीवापरासाठी दरवाढ करण्याचे जलसंपदा विभागाने प्रस्तावित केले होते. मात्र, तत्कालीन आघाडी सरकारने  हा प्रस्ताव नाकारला होता. त्यामुळे सध्याचे सरकार ही दरवाढ करते का, याकडे सगळळ्यांचे लक्ष लागले आहे. सिंचन योजनांच्या  व्यवस्थापनावर हा पाणी वसुलीपेक्षा जास्त खर्च होत असल्याने ही दरवाढ प्रस्तावित केली असल्याचे जलसंपदा विभागाने स्पष्ट केले आहे. वसुली रखडल्याने प्रकल्पांच्या देखभाल  दुरुस्तीवर पुरेसा निधी उपलब्ध होत नाही. याचा थेट परिणाम पाणी वितरणावर होतो. ही बाब शासनाने मान्य केलेली आहे. 

येत्या २०१७ ते २०१९ या कालावधीत राज्यात किमान ९११ कोटी रुपयांचा  देखभाल-दुरुस्तीचा खर्च अपेक्षित आहे. यामध्ये शेतीसाठी १७५ कोटी, घरगुती वापरासाठी २०० कोटी व औद्योगिक वापराला किमान ५६० कोटी रुपये  लागणार आहे. प्रकल्प व योजनांचा वाढत्या खर्चाचा डोलारा कसा सांभाळायचा, हा प्रश्न जलसंपदा विभागासमोर उभा ठाकला असल्याने वाढ प्रस्तावित केली आहे. या प्रस्तावानुसार शेतीच्या पाणी वापरावर २० टक्के, महापालिका क्षेत्रातील घरगुती वापरावर १४.३ टक्के, उद्योगासाठी किमान ४० टक्के वाढ प्रस्तावित आहे. २०१९ नंतर पुढील दरात सुधारणा होईपर्यंत दरवर्षी १० टक्क्यांनी वाढ केली जाणार आहे. शेतीसाठी पाणी वापराचे नवे दरजलसंपदा विभागाच्या दरवाढीच्या नव्या प्रस्तावानुसार शेतीच्या पाणीवापराचे नवे दर हंगाम व वर्गवारीनुसार वेगवेगळे राहतील. यामध्ये प्रवाही पाण्याच्या सिंचनासाठी सहकारी पाणी संस्थांना खरीप हंगामात ३ रुपये ६० पैसे, रबी हंगामाला ७ रुपये २० पैसे,तर उन्हाळ्यात १० रुपये ८० पैसे प्रति घनमीटर दर राहणार आहे. वैयक्तिक लाभधारकांसाठी या तिन्ही हंगामासाठी अनुक्रमे ४ रुपये ५० पैसे, ९ रुपये व १० रुपये ९६ पैसे प्रति घनमीटर असा दर राहणार आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी