शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य विभागात जिवतंपणा आणण्याची आवश्यकता

By admin | Updated: November 15, 2014 01:11 IST

शुक्रवारी दुपारी १२ वाजता आ. सुनील देशमुख यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट देऊन आरोग यंत्रणेची व्यवस्था पाहिली.

अमरावती : शुक्रवारी दुपारी १२ वाजता आ. सुनील देशमुख यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट देऊन आरोग यंत्रणेची व्यवस्था पाहिली. यावेळी आरोग्य विभागात जिवंतपणा आणण्याची गरज आहे, अशा सूचना जिल्हा शल्य चिकित्सक, अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिली. 'लोकमत'ने जिल्हा सामान्य रुग्णालयाची भयावह व्यवस्था वृत्ताच्या माध्यमातून उघड केली आहे. रुग्णालयातील दुरवस्थेचे दर्शन घडविणारे वृत्त प्रकाशित केल्याने जिल्हा आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. या अनुषंगाने जिल्हा आरोग्य विभाग सतर्क झाला असून शुक्रवारी दुपारी १२ वाजता दरम्यान नवनिर्वाचित आमदार सुनील देशमुख यांनीही जिल्हा सामान्य रुग्णालयातील समस्यांचा आढावा घेतला. तोकडा मनुष्यबळ, आरोग्य यंत्रणेतील बिघाड, डॉक्टरांचा निष्काळजीपणा तसेच अस्वच्छता या सर्व मुद्द्यांवर सुनील देशमुखांनी भर देऊन रुग्णालयातील पदाधिकाऱ्यांना धारेवर धरले. या सर्व समस्यांचे निराकरण करण्याच्या उद्देशाने देशमुख यांनी रुग्णालयातील प्रमुखांशी चर्चा करुन त्यांना आरोग्य सेवा सुधारण्याबाबत सूचना दिल्यात. यावेळी इर्विनमधील अस्वच्छता पाहून सुनील देशमुख संतप्त झाले होते. आईसीयुमधील डॉक्टरांच्या हलगर्जीपणाचा अनुभव त्यांना येताच त्यांनी संबंधित डॉक्टरांना तंबीसुध्दा दिली. अस्वच्छेतेबद्दल अधिकाऱ्यांना धारेधर धरले. इर्विनमधील थॅलीसिमिया विभागाची त्यांनी पाहणी करुन तेथील व्यवस्था पाहून कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. तसेच मधुमेह दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांनी मार्गदर्शन केले. अशा भोंगळ कारभाराने जिल्हाभरातून आशा घेऊन आलेल्या गोरगरीब रुग्णांचे हाल होत आहे. ‘यावर उपाययोजना करून रुग्णांना योग्य सेवा द्या. यंत्रणा सुस्थितीत आणा. हे तुमच्या पातळीवर होत नसेल तर मला सांगा. मी हे करवून घेईल’, असे आ. देशमुख यांनी जिल्हा शल्य चिकित्सक अरुण राऊत यांना बजावले. यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक अशोक वणकर, अन्य आरोग्यसेवा देणाऱ्या पदाधिकारी, अनिल पाटील, नगरसेवक अंबादास जावरे, उमेश घुरडे, प्रभात गवळी, अकिल, अहमद खान, बिलाल खान, गिरीश मेहता यांच्यासह आदींची यावेळी उपस्थिती होती. (प्रतिनिधी)