शरद पवार १० एप्रिलला अमरावतीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2022 11:02 IST2022-04-02T10:52:00+5:302022-04-02T11:02:55+5:30

शरद पवार यांच्या दौऱ्यामुळे अमरावतीत राजकीय घडामोडींना वेग

ncp leader Sharad Pawar visit to Amravati on April 10 | शरद पवार १० एप्रिलला अमरावतीत

शरद पवार १० एप्रिलला अमरावतीत

ठळक मुद्देराष्ट्रवादी काँग्रेसची विभागीय संवाद बैठक

अमरावती : विभागात राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधून पक्षाची स्थिती जाणून घेण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची संवाद बैठक १० एप्रिलला दुपारी तीन वाजता संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे होणार आहे. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार मार्गदर्शन करणार आहेत. शरद पवार यांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू झाली आहे.

बैठकीला प्रदेशाध्यक्ष मंत्री जयंत पाटील व ज्येष्ठ नेत्यांचेदेखील मार्गदर्शन लाभणार आहे. विभागातील पाचही जिल्ह्यांतील मंत्री, आमदार, माजी आमदार, प्रदेश पदाधिकारी, जिल्हा निरीक्षक, जिल्हाध्यक्ष, सर्व फ्रंटचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहतील. बैठकीच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके यांनी १ एप्रिलला अकोला शहर व ग्रामीणचा दौरा करून तेथील जिल्हाध्यक्ष, पक्ष निरीक्षक व सर्व पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. २ एप्रिलला ते अमरावती शहर व ग्रामीणची आढावा बैठक घेत आहेत. ३ एप्रिलला दुपारी यवतमाळ शहर व ग्रामीण, तर ४ एप्रिलला दुपारी अकरा वाजता बुलडाणा येथे आणि दुपारी तीन वाजता वाशिम जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची ते बैठक घेणार आहेत.

Web Title: ncp leader Sharad Pawar visit to Amravati on April 10