शहरं
Join us  
Trending Stories
1
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
2
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
3
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
4
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
5
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
6
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
7
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
8
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
9
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
10
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
11
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
12
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल
13
४०० इमारतींवर होर्डिंग्जचा भार; स्ट्रक्चरल ऑडिटकडे महापालिका लक्ष देणार काय? 
14
भावेशच्या एजन्सीचे लाभार्थी कोण? बँक खात्याची पाळेमुळे खणणार, २६ मेपर्यंत पोलिस कोठडी
15
मतदारराजा तुझ्याचसाठी सर्व तयारी; मतदान प्रक्रियेसाठी शहर जिल्हा प्रशासन सज्ज
16
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
17
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
18
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
19
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
20
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 

नवनीत राणांच्या वक्तव्याने विरोधकांच्या हाती कोलित; कडूंचाही भाजपला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2024 6:14 AM

स्वकियांचे नो कमेंट : ‘ताना’ व्हायरल

अमरावती : महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या ‘बाहेरच्यांनी’ या वक्तव्याने चांगलीच राळ उठवून दिली आहे. ते प्रत्युत्तर भाजपलाच ‘टोला टाईप’ असल्याने झपाट्याने व्हायरल होत असून विरोधकांच्या हाती मात्र आयते कोलित सापडले आहे. नवनीत राणा या भाजपमध्ये आल्या आहेत. आज ना उद्या त्या रवी राणा यांना आदेश देतील, ते देखील भाजपमध्ये येतील, असे भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी म्हटले होते. त्या संदर्भाने पत्रकारांनी नवनीत राणा यांना छेडले असता, मी स्वमर्जीने भाजपत आली. रवी राणा त्यांचा निर्णय घेतील. नवरा बायकोत बाहेरच्यांनी बोलू नये, अशी प्रतिक्रिया दिली. त्या प्रतिक्रियेने भाजपमधील अनेकांची पंचाईत केली आहे.

भाजपमध्ये येऊन आठ दिवस झाले नसताना आमचे प्रदेशाध्यक्ष नवनीत राणा यांच्यासाठी ‘बाहेरचे’ होतात, तर येथे त्यांच्या प्रचारात प्राणपणाने झोकून देणाऱ्यांचे काय, असा सवाल काही भाजपाईंचा आहे. याउलट नवनीत राणा यांचे बावनकुळेंना ‘बाहेरचे’ हे विशेषण विरोधकांना मुद्दा देऊन गेले आहे. त्यावर बावनकुळेंनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ती रिलिज करायला सांगते, असे भाजपच्या अमरावती लोकसभा प्रमुख निवेदिता चौधरी यांनी म्हटले आहे.

नवनीत राणा या बावनकुळेंच्या नव्हे तर इतरांनी जे भाष्य केले, त्यावर व्यक्त झाल्या. बावनकुळेंबाबत त्या अशा बोलूच शकत नाहीत. अपमान केला, असे मला अजिबात वाटत नाही. आमच्या टीममध्ये गोंधळ नाही. -शिवराय कुलकर्णी, प्रवक्ते, प्रदेश भाजप 

नवनीत राणांचा तो जुना स्वभाव आहे. ‘गरज सरो अन् वैद्य मरो’ अशी त्यांची प्रवृत्ती आहे. - यशोमती ठाकूर,काँग्रेसच्या आमदार, तिवसा 

आताच जर त्या बावनकुळेंना ‘बाहेरचे’ म्हणत असतील, तर भाजपचे आमदार, नगरसेवक, स्थानिक पदाधिकारी तर केव्हाच बाहेरचे झाले आहेत. भाजपच्या कार्यकत्यांनी चिंतन मनन करण्याची गरज आहे. -बच्चू कडू, प्रहारचे आमदार, अचलपूर  

टॅग्स :navneet kaur ranaनवनीत कौर राणाbig Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४Amravatiअमरावतीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४