अमरावती : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून बंडखोर आमदारांच्या कुटुंबीयांना धोका असून, त्यांना सुरक्षा प्रदान करा, तसेच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी मागणी खासदार नवनीत राणा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली. याबाबत राणा यांनी शनिवारी एक व्हिडीओ जारी केला.एकनाथ शिंदे यांच्यासोबत जे बंडखोर आमदार आहेत, ते खऱ्या अर्थाने शिवसैनिक आहेत. बाळासाहेब ठाकरे यांचे ते पाईक आहेत. बंडखोर आमदारांच्या कुटुंबातील सदस्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे, असे राण यांनी व्हिडीओत म्हटले आहे.
बंडखोरांच्या समर्थनार्थ राणा मैदानात; अमित शाहंकडे केली राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2022 07:29 IST