शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
3
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
4
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
5
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
6
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
7
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
8
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
9
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
10
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
11
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
12
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
13
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
14
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
15
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
16
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
17
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
18
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
19
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
20
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

गुढीपूजनासाठी नटली अंबानगरी

By admin | Updated: March 28, 2017 00:02 IST

चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा. भारतीय नववर्षाचा प्रारंभ गुढी पाडव्यापासून होतो.

मराठी नववर्षारंभ : घरोघरी तयारी, तरुणाई उत्साहातअमरावती : चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा. भारतीय नववर्षाचा प्रारंभ गुढी पाडव्यापासून होतो. उंच काठीवर तांब्याची पालथी लोेटी, भरजरी साडी, गाठी आणि कडुलिंबाच्या डाखळीने सजलेली गुढी दारोदारी उभारुन नववर्षांचे स्वागत करण्याची परंपरा आहे. पारंपारिक वेशभूषेत नटून-थटून मराठमोळ्या पद्धतीने मराठी नववर्षाचे स्वागत करण्यासाठी तरूणाईचा उत्साह यंदा ओसंडून वाहताना दिसतोय. याच उत्साहाचे पडसाद बाजारपेठेतही उमटले आहेत. बाजारपेठेतील लगबग शिगेला पोहोचल्याचे चित्र आहे. मराठी नववर्षाचा पहिला महिना म्हणजे चैत्र. उन्हाने यंदा कहर केलाय. चैत्रातच उकाडा असह्य होतोय. मात्र, असह्य तापमानात सुद्धा बाजारपेठेत गर्दी दिसून येत असून विधिवत गुढी पूजनाकरिता आवश्यक पूजा सामुग्रीच्या खरेदीची गृहिणींची लगबग चालली आहे. गुढीला पारंपारिक नऊवार, कोल्हापुरी नथ आणि इतर सौभाग्य साज चढवून नटविण्याचा भारीच उत्साह महिलांमध्ये दिसून येत पारंपारिक पद्धतीने नववर्षाचे स्वागत करण्यासाठी सरसावलेल्या विविध संघटनांच्या सदस्यांची भगवे फेटे खरेदी करण्यासाठी गर्दी उसळत आहे. तरूणाईची गर्दी झाली आहे. गुढी पाडव्याची पहाट उगवणार ती पावित्र्य, आनंद, उत्साह आणि जल्लोषाची गुढी घेऊनच. (प्रतिनिधी)८.२७ मिनिटांनंतर करावी गुढीची पूजा शके १९३९ या नूतन वर्षारंभी २८ मार्च रोजी मंगळवारी सूर्यादयानंतर सकाळी ८.२७ वाजेपर्यंत अमावस्या आहे. प्रतिपदेची समाप्ती २९.४५ वाजता म्हणजेच बुधवारी सूर्योदयापूर्वी पहाटे ५.४५ वाजता असल्यामुळे प्रतिपदेचा क्षय आहे. म्हणून २८ मार्च रोजी मंगळवारी सकाळी ८.२७ वाजतानंतर म्हणजे (अमावस्या समाप्तीनंतर) नेहमीप्रमाणे गुढी उभारून तिचे आणि पंचांगस्थ श्री गणपतीचे पूजन करावे, अशी माहिती ब्राह्मण वैभव श्रीराम कुळकर्णी यांनी दिली. नैसर्गिक महत्त्वगुढी पाडव्याच्या आसपास वसंत ऋतुला सुरु होते. यावेळी समशितोष्ण अशी उत्साहवर्धक व आल्हाददायक हवा असते, शिशीर ऋतुत झाडांची पाने गळून गेलेली असतात आणि पानगळती संपलेली असते तर दुसरीकडे झांडाना नवी पालवी येत असते. अशा आनंददायी वातावरणात येतो गुढीपाडव्याचा सण. यामुळेच या सणाचे आगळे महत्त्व आहे. नैसर्गिक पार्श्वभूमीही आहे. शुभेच्छांची देवाण-घेवाण गुढी पाडव्यापासून सुरू होणाऱ्या नववर्षानिमित्त पाच दिवस आधीपासूनच शुभेच्छांचे आदान-प्रदान सुरू झाले आहे. सोशल मिडियावरून तर शुभेच्छांचे सुंदर संदेश नातेवाईक व मित्र मंडळींना पाठविले जात आहेत. यात आकर्षक मजकूर टाकून पारंपारिकता जपण्यासाठी कल्पकता पणाला लावल्याचेही दिसून येते.