शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
2
"महाराष्ट्र पेटवण्याचा डाव..."; मीनाताई ठाकरे पुतळ्याची पाहणी, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या २ शंका
3
"प्रत्येक दुकानावर बोर्ड असायला हवा, 'गर्व से कहो...!'"; वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन
4
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
5
गोव्याच्या मनोहर पर्रीकरांचे नाव येताच रोखठोक अजितदादा निरुत्तर का झाले असावे? चर्चांना उधाण
6
पितृपक्ष २०२५: केवळ ५ मिनिटे गुरुपुष्यामृत योग, या दिवशी नेमके काय करावे? पाहा, सविस्तर
7
पीएम मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ तात्काळ हटवा; पाटणा उच्च न्यायालयाचा आदेश
8
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
9
Ind Vs. Pak Asia Cup: आशिया कपमधून बाहेर गेल्यास पाकिस्तानचं कंबरडं मोडणार, होणार 'इतक्या' कोटींचं नुकसान
10
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  
11
अकोला हादरले! शासकीय रुग्णालयातच एकाची दगडाने ठेचून हत्या, शाब्दिक वादातून मित्रानेच घेतला जीव
12
NEET च्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या आरोपीचा पोलिसांकडून एन्काऊंटर
13
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोटींची उधळपट्टी? कंत्राटदाराने २१ टक्के 'बिलो'ने काम घेतल्याने प्रकार उघडकीस
14
इनरवेअर बनवणाऱ्या शेअरचा जलवा! १०० स्टॉक्समधून एकाच महिन्यात २ लाख रुपयांची कमाई
15
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
16
"आमचे प्रेरणास्रोत..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींना इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून खास शुभेच्छा
17
अशक्यही होईल शक्य फक्त जिद्द हवी; १५ वर्षीय दृष्टीहीन करुणाने मिळवलं भारतीय संघात स्थान
18
५% व्याजावर ३ लाख रुपयांपर्यंतचं लोन; 'या' लोकांसाठी आहे मोदी सरकारचं मोठं गिफ्ट
19
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
20
कंपन्या जीएसटी रिकव्हरीच्या मुडमध्ये! २२ सप्टेंबरआधीच शाम्पू, साबण २० टक्के डिस्काऊंटवर विकू लागल्या... 

नाफेडच्या सबएंजटांनी लावली शेतकऱ्यांची वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 22:02 IST

नाफेडची सबएंजट असलेल्या खरेदी-विक्री संघाचे पदाधिकारी-कर्मचाऱ्यांची बहुतेक केंद्रांवर आॅनलाइन नोंदणीच्या नियमांना हरताळ फासला. यामुळे क्रमवारीत असलेले शेतकरी प्रतीक्षेतच राहीले.

ठळक मुद्देतूर, हरभऱ्याची खरेदी : निकटस्थांसह व्यापाऱ्यांचा फायदा; अमरावती, अचलपूर तालुक्यात गुन्हे नोंदविले, चांदूरबाजार रडारवर

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : नाफेडची सबएंजट असलेल्या खरेदी-विक्री संघाचे पदाधिकारी-कर्मचाऱ्यांची बहुतेक केंद्रांवर आॅनलाइन नोंदणीच्या नियमांना हरताळ फासला. यामुळे क्रमवारीत असलेले शेतकरी प्रतीक्षेतच राहीले. निकटस्थांना व व्यापाऱ्यांना फायदा देण्यासाठी केलेली हेरफेर जिल्हाधिकाऱ्यांनी वेळीच ओळखून गुन्हे नोंदविण्याचे आदेश दिल्याने या ठगबाजांच्या मोठ्या साखळीचा उलगडा होणार आहे.गतवर्षीच्या हंगामात तुरीचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न झाले. नाफेडच्या केंद्रावरही मोठ्या प्रमाणात हमीभावाने खरेदी करण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यासह राज्यातील गोदामे पूर्ण भरली असल्याने यंदा केंद्रांवर खरेदीची गती वाढलीच नाही. त्यामुळे आॅनलाइन नोंदणी केलेले अर्धेअधिक शेतकरी तूर विक्रीपासून वंचित राहिले. त्यामुळे निकटस्थांना लाभ देण्यासाठी व अर्थपूर्र्ण संबंधातून व्यापाऱ्यांची तूर विकली जावी, यासाठी सबएजंट संस्थेचे पदाधिकारी व कर्मचाºयांना हाताशी धरून खेळी केली.शेतकऱ्यांना यामध्ये एसएमएस न पाठविता क्रमवारी डावलून व नोंदणी रजिस्टरवर खोडतोड करून काही ठिकाणी जागा कोऱ्या ठेवून संबंधितांना फायदा देण्याचा प्रयत्न करण्यात आला. यामध्ये नोंदणी केलेला शेतकरी वंचित राहिल्याने काही शेतकºयांनी पुराव्यासह जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्यात. जिल्हाधिकाऱ्यांनीदेखील प्रकरणाचे गांभीर्य ओळखून संबंधित जिल्हा उपनिबंधकांना चौकशीचे आदेश दिलेत. यामध्ये सद्यस्थितीत अचलपूर व अमरावती तालुक्यातील आॅनलाइन नोंदणी आणि शेतकºयांच्या क्रमवारीमध्ये गोंधळ असल्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर झाला. याप्रकरणी त्यांनी सबएजंट असणाºया आणि दोषी असलेल्या पदाधिकारी व कर्मचाºयांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. प्रकरणात पोलिसांनी काही पदाधिकारी व कर्मचाऱ्यांना अटक केली. मात्र, या प्रकारामुळे शेतकरी तूर विक्रीपासून वंचित राहिले आहेत, तर काही शेतकरी शासनाने जाहीर केलेल्या अनुदानापासूनदेखील वंचित राहण्याची शक्यता आहे.शासन अनुदानातही व्यापाऱ्यांना फायदाजिल्ह्यात तुरीची ३६,६९९ व हरभऱ्याची २३,७९२ आॅनलाइन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदीअभावी घरीच पडून राहिला. १५ मेपासून तूर, तर १३ जूनपासून हरभऱ्याची शासन खरेदी बंद करण्यात आली. त्यामुळे नोंदणी केलेल्या किमान ६० हजार शेतकऱ्यांचा तूर व हरभरा अद्याप खरेदी करायचा आहे. या शेतकऱ्यांना आता दोन हेक्टर मर्यादेत प्रतिक्विंटल एक हजार रूपये अनुदान शासन देणार आहे. यामध्येही व्यापारांचाच अधिक फायदा आहे.व्यापाऱ्यांनीच लावला लाखोंचा चुनाखासगी बाजारात तुरीला हमीभावापेक्षा दोन हजारांनी कमी भाव व त्यातही गावागावांत त्यापेक्षा कमी भाव असल्याने काही स्थानिक व्यापाऱ्यांनी गावातून तुरीची खरेदी केली व शेतकऱ्यांच्या नावाआड विक्री केली. मात्र केंद्रावर खरेदीची गती मंदावल्यामुळे खरेदी केलेली तूर विकली जात नसल्याने त्यांनी सबएंजट संस्थांचे पदाधिकारी, व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांना हाताशी पकडून जो घोळ केला, तोच आता अंगलट आलेला आहे.शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याप्रकरणी अचलपूर व चांदूर बाजार तालुक्यात गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिलेत. चांदूरबाजारचीही तक्रार आहे. तेथेही चौकशी करण्यात येईल.- अभिजित बांगर जिल्हाधिकारी