शहानूर कॅनॉलमधील जळालेल्या मृतदेहाचे गूढ उकलले; वर्ध्याच्या तरुणाचा खून, ७ जण ताब्यात
By प्रदीप भाकरे | Updated: February 12, 2026 19:55 IST2026-02-12T19:54:09+5:302026-02-12T19:55:34+5:30
Amravati : शहानूर धरणाच्या कॅनॉलमध्ये अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटवण्यात अमरावती ग्रामीण पोलिसांना यश आले असून, हा तरुण वर्ध्याचा असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Mystery of burnt body in Shahanur Canal solved; Murder of Wardha youth, 7 arrested
अमरावती: शहानूर धरणाच्या कॅनॉलमध्ये अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटवण्यात अमरावती ग्रामीण पोलिसांना यश आले असून, हा तरुण वर्ध्याचा असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली असून एका विधीसंघर्ष बालकाला ताब्यात घेतले आहे.
११ फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास अचलपूर तालुक्यातील पथ्रोट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जहानपूर शिवारात, वाघडोह ते खोडगाव रोडवरील कॅनॉलमध्ये एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. आरोपींनी ओळख पटू नये यासाठी मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला होता. घटनेचे गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे शाखा, पथ्रोट पोलीस आणि अंजनगावचे एसडीपीओ मनीष ठाकरे यांच्या पथकाने संयुक्त तपास सुरू केला. अवघ्या काही तासांत मृताची ओळख शेख शाहरुख शेख रऊफ (रा. वर्धा) अशी पटवण्यात आली. तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी सहाजणांना निष्पन्न करून त्यांना बेड्या ठोकल्या. खुनाचा गुन्हा दाखल करून पोलीस आता हत्येमागच्या नेमक्या कारणाचा शोध घेत आहेत.