शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
3
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
4
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
5
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
6
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
7
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
8
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
9
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
10
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
11
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
12
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
13
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
14
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
15
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
16
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
17
"मी थकलेय, सकाळी नाश्ता मिळणार नाही"; नैराश्यातून आईने लेकीची केली हत्या, स्वतःलाही संपवले
18
देशात पेट्रोल १८, तर डिझेल ३५ रुपयांनी महाग होणार? तेल कंपन्यांना दररोज १,६०० कोटींचा फटका; निवडणुकीनंतर दरवाढीचे दणके
19
लहानग्यांसाठी 'या' देशात येतंय 'चाइल्ड सिम कार्ड'; इंटरनेटवर देणार सुरक्षा, भारतातही का गरजेचे?
20
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
Daily Top 2Weekly Top 5

‘हात-पैर जोडता माय, बच्चू को दवाखाना लेके चल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:13 IST

२४एएमपीएच०३ - सीटीसी केंद्रात दाखल करण्यात आलेल्या चिमुकलीसह तिची आजी २४एएमपीएच०४ - रेहट्याखेड्या येथील दोन वर्षाच्या बालकाला केंद्रात दाखल ...

२४एएमपीएच०३ - सीटीसी केंद्रात दाखल करण्यात आलेल्या चिमुकलीसह तिची आजी

२४एएमपीएच०४ - रेहट्याखेड्या येथील दोन वर्षाच्या बालकाला केंद्रात दाखल करण्यात आले.

--------------------------------------------------------------------------------------------मेळघाटचा ध्येयवेड्या डॉक्टर कमी वजनाचे बालक शोधून नेतो सीटीसी केंद्रात, कुपोषण टाळण्याचा प्रयत्न

लोकमत विशेष

नरेंद्र जावरे - चिखलदरा (अमरावती) : ‘तेरे हात-पैर जोडता माय, बच्चू को दवाखाना लेके चल. इस को अच्छा आहार और डॉक्टरों के नजर मे १५ दिन तक रख. वहा तुम्हारे खाने रहने की सब व्यवस्था करता. अपना बच्चा अपना को बचाना है. चल मेरी माय’, हे उद्गार कोण्या पालकाचे नव्हे, मेळघाटातील अवलिया एका ध्येयवेड्या डॉक्टरचे हे वाक्य आहेत. यात त्याची तळमळ दिसून येते. अतिदुर्गम आदिवासी पाड्यात घरोघरी जाऊन तो कमी वजनाची बालके शोधतो आणि न ऐकणाऱ्याचे हात पाय जोडून आरोग्य केंद्रातील सीटीसी केंद्रात उपचारासह पोषण आहारासाठी दाखल करीत आहे.

कुपोषणाचा कलंक लागलेल्या मेळघाटच्या चिखलदरा तालुक्यातील हे दृश्य आरोग्य यंत्रणेच्या काही चुकांवर पडदा टाकणारे ठरले आहे. तालुक्याच्या सेमाडोह प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत रेहट्याखेडा येथील डॉक्टर दीपक कुंडेटकर आणि वैद्यकीय अधिकारी सुषमा इंगोले, समुपदेशक शिवदास बिसंदरे, परिचारिका अर्चना नांदणे, एमपीडब्ल्यू बेठेकर, आशा सेविका धुर्वे, चालक विजय धुर्वे ही चमू लसीकरणानंतर पुन्हा कुपोषित कमी वजनाच्या बालकांच्या शोधमहिमेला लागली आहे. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात जलजन्य रोगाचा प्रादुर्भाव होतो आणि कुपोषित बालके दगावतात. शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या योजना गेल्या अनेक वर्षांपासून असल्या तरी मातामृत्यू व बालमृत्यूचे प्रमाण योग्य पोषणाअभावी आहेच. ते रोखण्यासाठी सुरू असलेली धडपड दखलयोग्य ठरली आहे. यापूर्वी कोरोना लसीकरणासाठी शेतीमध्ये पेरणी करून देणारे डॉक्टर दीपक कुंडेटकर आता या घटनेने पुन्हा चर्चेत आले आहेत. सातव्या महिन्यात प्रसूती झालेल्या एका आदिवासी महिलेला आरोग्य केंद्रात नेण्यासाठी सासूच्या शिव्याशापसुद्धा ते ऐकून घेत आहेत.

बॉक्स

चल मेरी बहना, बच्चों को बचाना है

सेमाडोह प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत असलेल्या रायपूर येथील कविता प्रकाश धिकार (२२) या आदिवासी महिलेची १३ जुलै रोजी रात्री प्रसूती झाली. माहिती मिळताच १४ जुलैला सकाळी डॉक्टर व त्यांच्या चमूने प्रसूत महिलेचे घर गाठले. बाळाचे वजन केवळ १६०० ग्रॅम होते. घरीच प्रसूती झाल्याने डॉक्टरांनी दुसऱ्याचा दिवशी दवाखान्यात दाखल होण्याची विनवणी केली. मात्र, सासू शिव्याशाप देऊ लागली. डॉक्टरांनी हातपाय जोडून त्यांना विश्वासात घेतले आणि सेमाडोह प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. तेथे सीटीसी केंद्रात पोषण आहार व उपचार सुरू आहे. आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी सुषमा इंगोले, डॉ. दीपक कुंडेटकर लक्ष ठेवून आहेत.

बॉक्स

दोन वर्षांचा आकर्षण घेतो उपचार

शून्य ते सहा वर्षे वयोगटातील कुपोषित बालकांसाठी आरोग्य विभाग, महिला व बाल कल्याण विभागांतर्गत चालणाऱ्या अंगणवाडी, ग्रामपंचायत, शिक्षण विभाग, आदिवासी विभाग, पुरवठा विभाग आदी सर्वांचे कार्य महत्त्वपूर्ण असताना आरोग्य आणि अंगणवाडी सेविका यांच्यावरच जबाबदारी लोटली जाते. रेहट्याखेडा येथील आकर्षण सुखदेव सेलूकर या दोन वर्षे वयाच्या बालकाचे वजन कमी असल्याने त्यालाही सेमाडोह येथे सीटीसी केंद्रात भरती करण्यात आले आहे

कोट

कमी वजनाच्या बालकांचा शोध घेऊन त्यांना आरोग्य केंद्रातील सीटीसी केंद्रात योग्य पोषण आहार व औषध उपचार करून वजन वाढविले जात आहे. कुपोषण व होणारे बालमृत्यू कमी करण्यासाठी प्रामाणिकपणे आमची चमू काम करीत आहे.

- डॉ. दीपक कुंडेटकर, प्राथमिक आरोग्य केंद्र, सेमाडोह (ता. चिखलदरा)