शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
4
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
5
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
6
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
7
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
8
बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
9
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
10
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
11
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
12
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
13
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
14
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
15
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
16
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
17
इराणने लवकर शहाणे व्हावे...; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
19
एकीची मेहंदीही निघाली नव्हती, तर दुसरीचे मेमध्ये होते लग्न, पण काळाने घातला घाला
20
मे डे... मे डे... मे डे...! हे उद्योगाचे आर्थिक गाऱ्हाणे नाही तर एका मोठ्या राष्ट्रीय संकटाची नांदी
Daily Top 2Weekly Top 5

अनैतिक संबंधाच्या संशयावरून पत्नीची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2022 05:01 IST

सविताने घरी परतण्यास नकार दिला. जुना धामणगाव येथील संबंधित व्यक्तीनेसुद्धा कुटुंबात वाद नको म्हणून सविताला जवळच्याच दाभाडे रस्त्यावरील गजानन गोठाणे यांच्या वीटभट्टीवर नेऊन ठेवले. ही माहिती दिनेशला कळताच त्याने ८ मार्च रोजी दुपारी १ च्या सुमारास वीटभट्टी गाठून शस्त्राने सवितावर सपासप वार करून तिला जागीच ठार केले.

लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव रेल्वे : अनैतिक संबंधाच्या कारणावरून पतीने पत्नीची धारदार शस्त्राने हत्या केल्याची   घटना जुना धामणगाव परिसरातील वीटभट्टीवर मंगळवारी दुपारी घडली. सविता दिनेश खेडकर असे मृताचे नाव आहे, तर आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे. तालुक्यातील अंजनसिंगी वाॅर्ड नंबर ४ येथील हातमजुरी करणाऱ्या दिनेश सुधाकर खेडकर याचे आठ वर्षांपूर्वी वडरपुरा अमरावती येथील सविता या युवतीशी लग्न झाले. दोन वर्षांपूर्वी रोजगाराच्या निमित्ताने दिनेश पत्नीसह वडरपुरा अमरावती येथे सासूरवाडीला राहू लागला. दरम्यान, जानेवारी महिन्यात सविता आपल्या एका लहान मुलाला सोबत घेऊन कोणाला काहीही न सांगता तेथून निघून गेली होती.  सविता जुना धामणगाव येथील एका व्यक्तीच्या घरी राहत असल्याची माहिती दिनेशला मिळाली. त्याने अंजनसिंगी येथील आपल्या आईवडिलांना सांगून सविताच्या अशोकनगर येथील एका नातेवाईकास घेऊन तिची समजूत काढली. मात्र सविताने घरी परतण्यास नकार दिला. जुना धामणगाव येथील संबंधित व्यक्तीनेसुद्धा कुटुंबात वाद नको म्हणून सविताला जवळच्याच दाभाडे रस्त्यावरील गजानन गोठाणे यांच्या वीटभट्टीवर नेऊन ठेवले. ही माहिती दिनेशला कळताच त्याने ८ मार्च रोजी दुपारी १ च्या सुमारास वीटभट्टी गाठून शस्त्राने सवितावर सपासप वार करून तिला जागीच ठार केले. दत्तापूरचे  ठाणेदार राजेश राठोड यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळ गाठले.  

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी