शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
4
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
5
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
6
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
8
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
9
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
10
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
11
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
12
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
13
Health Tips: उन्हाळ्यात प्रकृती थंड ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरांनी सांगितला SST फॉर्म्युला!
14
मनसे नेते अमित ठाकरेंचं शालेय शिक्षणमंत्र्यांना पत्र; RTE प्रवेश प्रक्रियेवरून नाराजी
15
'देशात काँग्रेस संपत असताना पाकिस्तानला रडू येतंय'; व्होट जिहादवरुन मोदींचा निशाणा
16
Guru Asta 2024: गुरु अस्त काळात होणार राजकीय उलथापालथ? मंगल कार्य वर्ज्य? वाचा उपाययोजना!
17
Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत झाली मोठी घसरण, ७५००० च्या उच्चांकावरून ७१००० रुपयांवर आलं गोल्ड
18
Goldy Brar Murder : गोल्डी ब्रारच्या हत्येची बातमी अफवा; अमेरिकन पोलिसांनी केले स्पष्ट
19
कोकणात दादा आणि भाईंचं मनोमीलन कसं झालं? खुद्द केसरकर यांनीच सांगितली 'इनसाईड स्टोरी'   
20
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती

महापालिकेची ज्येष्ठांसाठी ‘मिशन व्हॅक्सिनेशन’ माेहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2021 5:00 AM

महापालिकेतर्फे डॉ.पंजाबराव देशमुख महाविद्यालय व दंत महाविद्यालय येथे ज्‍येष्‍ठांसाठी लसीकरण सुरू केले आहे. शुक्रवारी  नव्‍याने आयसोलेशन दवाखाना दसरा मैदान, बडनेरा येथे मोदी हॉस्‍पिटल, भाजीबाजार येथील शहरी आरोग्‍य केंद्र महेंद्र कॉलनी, शहरी आरोग्‍य केंद् दस्‍तुरनगर, मनपा शाळा नागपुरी गेट हे सहा केंद्र सुरू करण्‍यात आले आहे.

ठळक मुद्देमहापौरांच्या हस्ते प्रारंभ, शुक्रवारी नव्याने सहा केंद्रे सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महापालिका प्रशासनाने ज्येष्ठांसाठी ‘मिशन व्हॅक्सिनेशन’ मोहिमेंतर्गत शुक्रवारी शहरात नव्याने सहा लसीकरण केंद्रे सुरू केले. त्यामुळे आता ४५ वर्षांवरील को-मॉर्बेडिटी रुग्ण व ज्येष्ठांना लसीकरण सोयीचे  होणार आहे.महापालिकेतर्फे डॉ.पंजाबराव देशमुख महाविद्यालय व दंत महाविद्यालय येथे ज्‍येष्‍ठांसाठी लसीकरण सुरू केले आहे. शुक्रवारी  नव्‍याने आयसोलेशन दवाखाना दसरा मैदान, बडनेरा येथे मोदी हॉस्‍पिटल, भाजीबाजार येथील शहरी आरोग्‍य केंद्र महेंद्र कॉलनी, शहरी आरोग्‍य केंद् दस्‍तुरनगर, मनपा शाळा नागपुरी गेट हे सहा केंद्र सुरू करण्‍यात आले आहे. या मोहिमेला गतिमान करण्यासाठी  महापौर चेतन गावंडे यांच्‍या उपस्थितीत भाजीबाजार येथे आझाद हिंद मंडळाचे सभासद प्रकाश संगेकर व नीळकंठ मंडळाचे सभासद प्रमोद गंगात्रे यांना लस देऊन मोहिमेची सुरुवात झाली. यावेळी आयुक्‍त प्रशांत रोडे, माजी महापौर विलास इंगोले, विवेक कलोती, नगरसेवक आशिष अतकरे, उपायुक्‍त रवि पवार, वैद्यकीय आरोग्‍य अधिकारी विशाल काळे उपस्थित होते. बडनेरा स्थित मोदी हॉस्पिटल येथे भास्करराव कुळकर्णी यांना लस देऊन कोरोना लसीकरण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी महापौर चेतन गावंडे, आयुक्त प्रशांत रोडे, भाजपाचे  शिवराय कुळकर्णी, नगरसेवक प्रकाश बनसोड, गंगा अंभोरे, मो. इमरान, सहायक आयुक्‍त विशाखा मोटघरे, सई कुळकर्णी उपस्थित होते. शहरी आरोग्‍य केंद्र दस्‍तुरनगरात लस घेऊन या केंद्राच्‍या लसीकरणात वसंत आबाजी डाहाके यांनी सहभाग नोंदवला.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस