शहरं
Join us  
Trending Stories
1
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
2
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
3
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
4
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
5
"अभी तो मै जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
6
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
7
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
8
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
9
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
10
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
12
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
13
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
14
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
15
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
16
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
17
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
18
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
19
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
20
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका कर्मचाऱ्यांचे ‘कामबंद’

By admin | Updated: October 15, 2016 00:13 IST

सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी दिवाळीपूर्वी द्यावी, या मागणीसाठी महापालिका कर्मचाऱ्यांनी शुक्रवार १४ आॅक्टोबरपासून बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले आहे.

कामकाज प्रभावित : ३१ कोटींची थकबाकी अमरावती : सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी दिवाळीपूर्वी द्यावी, या मागणीसाठी महापालिका कर्मचाऱ्यांनी शुक्रवार १४ आॅक्टोबरपासून बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले आहे. महानगरपालिका कर्मचारी - कामगार संघ आणि सफाई कामगार संघटनेने या आंदोलनाची हाक दिल्याने महापालिकेतील कामकाज प्रभावित झाले आहे.महापालिकेने शासननिर्णयानुसार, कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोग लागू केला.मात्र १ जानेवारी २००६ ते ३० एप्रिल, २०१० पर्यंतची थकबाकी अदा केलेली नाही, असे आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. ही थकबाकी सुमारे ३१ कोटींच्या घरात आहे.यासंदर्भात महापालिका प्रशासनाकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याने नाईलाजास्तव कामबंद आंदोलन पुकारल्याचे सरचिटणीस प्रल्हाद कोतवाल यांनी म्हटले आहे. दरम्यान या कामबंद आंदोलनात १०३ पेक्षा अधिक कर्मचारी व ७६३ सफाई कर्मचारी सहभागी झाल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाने दिली. याउलट या कामबंद आंदोलनात १५०० पेक्षा अधिक कर्मचारी सहभागी झाल्याचा दावा महापालिका कर्मचारी-कामगार संघाचे सरचिटणीस प्रल्हाद कोतवाल यांनी केला आहे. १५० पेक्षा अधिक कर्मचारी महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या देत आहेत. यात महिला कर्मचाऱ्यांचा सहभाग लक्षणीय होता. या आंदोलनात अनेक कर्मचारी सहभागी झाल्याने शुक्रवारी महापालिकेत शुकशुकाट होता. विभागप्रमुखांसह मोजकेच अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. कामबंद आंदोलनामुळे शनिवारी अनधिकृत बांधकामावर होणाऱ्या कारवाईला ब्रेक बसला. यथा स्वच्छतेचा बोजवारा उडाला.थकबाकीसाठी प्रशासकीय विषयमहापालिका आस्थापनेवरील कर्मचारी व अधिकारी तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना १ जानेवारी २००६ ते ३० एप्रिल, २०१० पर्यंतची थकबाकी अदा करण्यासाठी धोरण निश्चित करण्यात येणार आहे.त्यासाठी आॅक्टोबरच्या आमसभेत प्रशासकीय विषय घेण्यात येणार आहे. आयुक्त हेमंत पवार या थकबाकीबाबत सकारात्मक आहेत. तूर्तास ही थकबाक ी देणे शक्य नाही. हा धोरणात्मक निर्णय असून कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी द्यावी किवा कसे यावर निर्णय होणे अपेक्षित असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.