शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

मेळघाटात फगव्याला प्रारंभ; रस्त्यावर, घरोघरी, नृत्य, संगीताची तालावर रकमेची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2020 6:31 PM

मेळघाटातील आदिवासी बांधवांचे सर्वात मोठे होळी सणाला मंगळवारपासून खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे.

- श्यामकांत पाण्डेय/धारणी

अमरावती : मेळघाटातील आदिवासी बांधवांचे सर्वात मोठे होळी सणाला मंगळवारपासून खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. आपापल्या गावातील होळी जाळल्यानंतर आता पुरुष-महिलांचे  टोळके दुसऱ्या गावात फगवा मागण्यासाठी निघाल्या आहेत. ज्यांच्याशी त्यांची ओळख असते, अशा लोकांकडून हक्काने फगवा मागितला जात आहे. कोणत्याही प्रकारची बळजबरी किंवा आग्रह न बाळगता, जे काही मिळेल ते स्वीकारीत घराघरांतून फगवा वसुली करण्यात येत आहे. 

‘बेचो तुम्हारी जोरु का लहंगा, देओ हमारा फगवा देओ, धोटा (मर्द) हो ठहरो रे, जपाय (औरत) हो तो भागो रे, होली का डंडा जली गयो रे, देओ हमारा फगवा देओ’ हे सूर आता मेळघाटातील गावागावांत ऐकावयास मिळू लागले आहे. त्यानिमित्ताने होळी जळाल्यानंतर आत रंगपंचमीनिमित्त पुढील पाच दिवस फगवा उत्सवाची धूम सुरू झाली आहे. 

रस्ता अडवा - फगवा मिळवा

ज्या पद्धतीने शासन ‘पाणी अडवा - पाणी जिरवा’ योजना राबविते, त्याचप्रमाणे आदिवासी बांधव होळीनंतर मेळघाटातील रस्त्यांवर लाकूड व दगड टाकून वाट अडवितात. येणाºया-जाणाºया वाहनचालकांकडून फगवा वसुल केल्यावरच रस्ता मोकळा करण्यात येतो. यात कोणत्याही वाहनाची गय केली जात नाही. खासगी, शासकीय, एसटी बस, एवढेच नव्हे तर पोलिसांचे वाहनही याला अपवाद ठरत नाही. लोकंही काही काळ ना-ना म्हणत फगवा देऊन आपली सुटका करुन घेतात. 

बालगोपालांची गाणे 

‘जल्दी जल्दी देना बाई, भोकरबर्डी जाना है, आलू का चटणी हम नदी खाना, क्यों नही खाना, मिठा नहीं लगता’ आणि ‘कोठी से निकाल, सुपडे मे डाल’ असे गाणे म्हणत, नाचत-गात बालगोपालांचादेखील फगवाचे उत्सव मेळघाटात पाहावयास मिळत आहे.

टॅग्स :AmravatiअमरावतीHoliहोळीMaharashtraमहाराष्ट्र