शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

सात तालुक्यात कोसळल्या मृगधारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 5:00 AM

चांदूर रेल्वे शहरातून पळसखेडकडे जाणाऱ्या रेल्वे अंडरब्रिज मार्ग पावसाने तुंबला होता. अशातच रेल्वे फाटक बंद असल्याने पुलाखालून वाहन काढण्याच्या प्रयत्नात असलेल्या वाहनचालकाचे नियंत्रण सुटल्याने ते नाल्यात कोसळले. वर्धा मार्गावर रेल्वे रुळाचे काम सुरू असल्याने या पुलाखालून जाणाऱ्या एसटी बसेस फेऱ्या घेऊन पुढे रवाना करण्यात आल्या. चांदूर शहरात दुपारी १२ पावसाची सुरुवात झाली. तब्बल तीन तास पाऊस कोसळल्याने दैनंदिन कामकाजावर परिणाम झाला.

ठळक मुद्देआनंदोत्सव : संपूर्ण जिल्ह्यात ढगाळ वातावरण, मृगाच्या प्रारंभीच दमदार सुरुवात, शेतकऱ्यांची लगबग

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पावसाची वाट पाहणाऱ्या अमरावतीकरांना गुरुवारी मान्सूनने सुवार्ता दिली. दुपारी १२ नंतर सुमारे २ ते ३ तास दमदार पाऊस कोसळला. धामणगाव रेल्वे, दर्यापूर तालुक्यातील नदी-नाले पावसाने प्रवाही झाले. अमरावती शहरात पहिल्याच पावसाने दाणादाण उडविली. नौकरदारांची चांगलीच तारांबळ उडाली. अमरावती, भातकुली, तिवसा, दर्यापूर, धामणगाव रेल्वे, अचलपूर, चांदूररेल्वे या तालु्क्यात गुरुवारी मुसळधार पावसाने खरीप हंगामाची धामधूम वाढविली. धामणगाव :  गुरुवारी संपूर्ण तालुक्यात  दुपारपासून पावसाने दमदार सुरुवात केल्याने नाले वाहू लागले आहेत.  विजेच्या कडकडाटासह पावसाने दमदार सुरुवात केली.  काही शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पेरणी सुरू केली होती. परंतु, मोठ्या प्रमाणात पाऊस आल्याने ते पेरणीविनाच परतले. धामणगावात दमदार पाऊस आल्याने बळीराजा सुखावला.  पहिल्यांदाच काही भागातील नाल्यांना पूर आला. आगामी तीन दिवस पावसाचे असल्याने तसेच जमिनीत ओलावा निर्माण झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी सागर इंगोले यांनी दिली. तिवसा : शहरात गुरुवारी दुपारी १२.२० वाजता वादळी पाऊस कोसळला. मान्सूनने हजेरी लावल्याने शेतकरी आनंदला आहे. सुमारे दोन तास पाऊस कोसळला. चांदूूररेल्वे : गुरुवारी अचानक बरसलेल्या पावसामुळे शहरातील नाले तुडुंब भरले होते. काही भागात  नाल्यातील पाणी अनेक ठिकाणी अडल्याने ते पाणी सखल भागात शिरले. काही नाल्यांमध्ये अनेक ठिकाणी झाडे तुटून पडली होती. चांदूर रेल्वेच्या नगराध्यक्षांनी स्वतः नाल्यांमध्ये जेसीबीच्या साह्याने तुडुंब भरलेले नाले मोकळे केले. वरूड : तालुक्यात दुपारी ३ वाजताच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला. दर्यापूर तालुक्यात देखील दुपारनंतर अर्धा तास मान्सूनच्या सरी कोसळल्या.भातकुली : तालुक्यातील रामा, टाकरखेडा संभू, अळणगाव, गोपगव्हाण, निंभा, खारतळेगाव, वाठोडा भागात मृगधारा कोसळल्या. उर्विरत गावात ढगाळ वातावरण आहे.चांदूर रेल्वे शहरातून पळसखेडकडे जाणाऱ्या रेल्वे अंडरब्रिज मार्ग पावसाने तुंबला होता. अशातच रेल्वे फाटक बंद असल्याने पुलाखालून वाहन काढण्याच्या प्रयत्नात असलेल्या वाहनचालकाचे नियंत्रण सुटल्याने ते नाल्यात कोसळले. वर्धा मार्गावर रेल्वे रुळाचे काम सुरू असल्याने या पुलाखालून जाणाऱ्या एसटी बसेस फेऱ्या घेऊन पुढे रवाना करण्यात आल्या. चांदूर शहरात दुपारी १२ पावसाची सुरुवात झाली. तब्बल तीन तास पाऊस कोसळल्याने दैनंदिन कामकाजावर परिणाम झाला. 

दर्यापुरात मुसळधार पाऊस बरसलादर्यापूर :  तालुक्यात १८  तासात दोनदा मुसळधार पावसाने हजेरी लावली. बुधवारी रात्री ९ वाजता दरम्यान तालुक्यात सर्वत्र मुसळधार पाऊस बरसला. गुरुवारी दुपारी वाऱ्यांसह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. यामुळे शेतकऱ्यांनी शेतीच्या कामांना सुरुवात केली. गुरुवारी दुपारी शहरासह तालुक्यातील अनेक भागात पावसाने हजेरी लावली होती.

शहरात धुवांधारशहरात दुपारी १२ ते २ या कालावधीत संततधार कोसळली. त्यामुळे अंबा नाला प्रवाही झाला. तर, चौधरी चौकातील रामलक्ष्मण संकुल,  मालविय चौकातील उड्डाणपुलालगतच्या भागातील सखल भागात पाणी साचले.

मोती कोळसा नदीला पूरतळेगाव दशासर : गुरुवारी दुपारी एक ते दीड वाजताच्या दरम्यान जोरदार पावसाला सुरुवात झाली. जवळपास तीन तास सारखा दमदार पाऊस कोसळल्याने तळेगाव येथील मोती कोळसा नदीला पूर आला होता.

जळू येथे वीज कोसळून तीन जनावरे दगावलीनांदगाव खंडेश्वर : तालुक्यात बुधवारी दुपारी ३ ते ५ दरम्यान जोरदार पाऊस कोसळला. जळू येथे दुपारी ३ च्या सुमारास वीज कोसळून तीन गाई दगावल्या. जळू येथील मनोहर गायकी हे गुरे चारून गावाकडे येत असताना पाऊस सुरू झाल्याने गावामागील वडाच्या झाडाखाली गाई थांबल्या. तेथे वीज कोसळल्याने तीन गाई जागीच ठार झाल्या. सुदैवाने मनोहर हे तेथून घरी आल्याने वाचले. याशिवाय येणस-काणस शिवारात लिंबाच्या आकाराची गार पडली. यामुळे आंबिया बहराची संत्री गळाली. या परिसरात वादळी पाऊस झाल्याने शेताचे बांध फुटले व कपाशीचे लागवड केलेले बियाणे मातीखाली दडपले, असे येणस येथील शेतकरी मनोज कडू यांनी सांगितले.

 

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर