प्रांगणात महिलांसोबत धावल्या खासदार नवनीत राणा, स्पर्धकांचा वाढविला उत्साह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2021 17:02 IST2021-12-26T16:47:01+5:302021-12-26T17:02:17+5:30

दैनंदिन कामातील व्यस्ततेमुळे महिलांचे स्वत:कडे दुर्लक्ष होते. मात्र, महिलांनी शारीरिक व मानिकदृष्ट्या सक्षम राहण्यासाठी वेळात वेळ काढून व्यायाम करावा व स्वत:ला सुदृढ ठेवावे, असा सल्ला नवनीत राणांनी महिलांना दिला.

mp navneet rana participates in running competition video viral | प्रांगणात महिलांसोबत धावल्या खासदार नवनीत राणा, स्पर्धकांचा वाढविला उत्साह

प्रांगणात महिलांसोबत धावल्या खासदार नवनीत राणा, स्पर्धकांचा वाढविला उत्साह

अमरावती : राजकारण-समाजकारणात अव्वल असणाऱ्या खासदार नवनीत राणा यांनी रनिंग स्पर्धेत सहभाग घेऊन स्पर्धकांचा उत्साह वाढवला. इतकेच नव्हे तर त्यांनी या स्पर्धेत प्रथम क्रमांकही पटकावला.

राजस्थानी हितकारक महिला मंडळातर्फे हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या प्रांगणात महिलांसाठी रनिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये स्पर्धेत सहभागी महिलांसह उपस्थित महिलांचेही मनोबल नवनीत राणा यांनी वाढवले. दैनंदिन कामातील व्यस्ततेमुळे महिलांचे स्वत:कडे दुर्लक्ष होते. मात्र, महिलांनी शारीरिक व मानिकदृष्ट्या सक्षम राहण्यासाठी वेळात वेळ काढून व्यायाम करावा व स्वत:ला सुदृढ ठेवावे, असा सल्ला त्यांनी महिलांना दिला.  

यासोबतच, त्यांनी राजस्थानी हितकारक महिला मंडळाने आयोजित केलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले. महिला आता सर्व क्षेत्रात अग्रेसर असून चूल व मूल यापलीकडे जाऊन महिलांनी स्वतःला सिद्ध केल्याची प्रतिक्रिया राणा यांनी दिली.

Web Title: mp navneet rana participates in running competition video viral