साथ सबका विकास खऱ्या अर्थाने सिद्ध करणारा जनतेच्या हिताचा अर्थसंकल्प : नवनीत राणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2022 18:34 IST2022-02-01T18:24:32+5:302022-02-01T18:34:57+5:30
सामान्यांना न्याय देणारा आणि सबका साथ सबका विकास खऱ्या अर्थाने सिद्ध करणारा जनतेच्या हिताचा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया खासदार राणा यांनी दिली.

साथ सबका विकास खऱ्या अर्थाने सिद्ध करणारा जनतेच्या हिताचा अर्थसंकल्प : नवनीत राणा
अमरावती : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी आज मंगळवारी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. यावर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. सामान्यांना न्याय देणारा आणि सबका साथ सबका विकास खऱ्या अर्थाने सिद्ध करणारा जनतेच्या हिताचा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा व अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे आभार. केंद्र सरकारने या अर्थसंकल्पात महाराष्ट्र सरकारला १ लाख कोटींची भरीव मदत केली असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महाविकास आघाडी सरकारने या निधीचा योग्य वापर करून केंद्र सरकारच्या योजना पारदर्शीपणे राबवाव्यात, असेही नवनीत राणा म्हणाल्या.