मोझरी खोऱ्यातील जंगल आगीच्या भक्षस्थानी

By admin | Published: February 28, 2017 12:07 AM2017-02-28T00:07:20+5:302017-02-28T00:07:20+5:30

पूर्व मेळघाट वनविभागाच्या चिखलदरा वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या मोझरी खोऱ्याच्या जंगलात सोमवारी सकाळी ११ वाजतापासून भीषण आग लागल्याचे चित्र आहे.

Mozilla valley forest firefighters | मोझरी खोऱ्यातील जंगल आगीच्या भक्षस्थानी

मोझरी खोऱ्यातील जंगल आगीच्या भक्षस्थानी

Next

सर्वत्र धूर पसरला : चिखलदरा परिक्षेत्रात आगडोंब उसळला
परतवाडा : पूर्व मेळघाट वनविभागाच्या चिखलदरा वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या मोझरी खोऱ्याच्या जंगलात सोमवारी सकाळी ११ वाजतापासून भीषण आग लागल्याचे चित्र आहे. दुपारी ४ वाजतानंतर उशीरा जाग आलेल्या वनविभागाने विझविण्याचे कार्य सुरू केल्याचे गंभीर वृत्त आहे.
उन्हाळ्याची चाहुल लागताच मेळघाटात दरवर्षी मोठ्या प्रमाणात जंगल आगीच्या भक्षस्थानी जाते.

उन्हाळ्याच्या प्रारंभीच आगडोंब
परतवाडा : हजारो हेक्टर जंगलाची राखरांगोळ होते. या वर्षी उन्हाळ्याची चाहुल लागण्यापूर्वीच आगडोंब उसळायला सुरुवात झाल्याने उर्वरित चार महिन्यात गतवर्षी प्रमाणेच जंगला आगीच्या हवाली सुट्याची भीती निसर्गप्रेमींनी व्यक्त केली आहे. चिखलदरा पर्यटन महोत्सव सुरू असताना उद्घाटनाला वनमंत्री सुधीर मुनगुंटीवार येणार होते. त्यांच्यासाठी हजारो रुपये खर्च करुन रात्रदिवस एक करीत हेलीपेड बनविण्यात आले. मात्र मंत्रीद्वय वेळेवर नियोजन बदलल्याने दौरा रद्द झाला. दरम्यान वनमंत्री बेनाट असल्याने येते वन आणि व्याघ्र प्रकल्पाचे सर्वोच्च अधिकारी उपस्थित आहेत.अश्यात मोझरी खोऱ्यात सोमवारी सकाळ पासून आगठोंब उसळत आहे.
अंगारी, गावकरी अन कर्मचारी : मेळघाटातील जंगलात आगी मोठ्या प्रमाणात नैसर्गिक रित्या लागत नसून ेलावल्या जात असल्याचे अनेकदा सिद्ध झाले आहे. पावसाळ्यात गुरांसाठी चारा यादावा, मोहफूल वेचण्यात अडचण येवू नये व तेंदूपत्याला कोवळी पाने यावी यासाठी या आगी लावल्या जातात. मात्र विज्ञविण्यासाठी वन आणि व्याघ्र प्रकल्पात बोटावर मोजले मजूर रोजंदारी वने लावल्यासह वनकर्मचारी गावकऱ्यांच्या सहकार्याने आग विज्ञविण्याचे कार्य केल्या जात,सोमवारी मोझरी जंगलात लागलेल्या आगीला विझविण्यासांठी या पद्धतीचा अवलंब करण्यात आला. (तालुका प्रतिनिधी)

सर्वत्र धुराचे लोट पसरले
मोझरी खोऱ्यात किमान आठ ते दहा ठिकाणी आगडोंब लागल्याचे चित्र होते. हवेमुळे मोठ्या प्रमाणात मोसरी खोऱ्यातील जंगल या आगीने कुवेत घेतली होते. गाविलगड किल्ला, देवी पार्इंट आणि मोझरी पॉर्इंटवरुन धुरांच्या लोटाने ही संपूर्ण परिसर पांढरा सुभ्र झाला होता. या पाईन्वटवरुन दुसऱ्या पार्इंटवरील दृश्य दिसणे धुसर झाले होते.

वनविभागाला उशिरा जाग
पूर्व मेळघाट वनविभागाच्या कार्यालयानजीकच्या मोझरी पॉर्इंट खोऱ्यात लालगेली आग विझविण्यासाठी चिखलदरा परिक्षेत्र कार्यालयातून सायंकाळी ४ वाजता अंगरी, वनरक्षकांना पाठविण्याची तैयारी सुरु होती. सलग आठ तासापर्यंत आग लागल्यावर त्याची माहिती उशिरा मिळण्यासोबत त्यानंतर कर्मचारी पाठविण्यात येत असल्याचे चित्र मेळघाटात सर्वत्र दिसून येते.

सॅटेलाईट ते वॉकीटॉकी यंत्रणा कुचकामी
सातपुडा पर्वत रांगात बसलेल्या मेळघाटच्या जंगलातील दऱ्याखोऱ्यांत लागलेल्या आगाची माहिती तत्काळ मुख्य कार्यालयासह प्रत्यक्ष जंगलात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यापर्यंत पोहचविण्यासाठी सॅटेलाईट ते वॉकीटॉकी यंत्रणा कार्यरत असल्याचा कांगावा वरिष्ठ अधिकारी करीत असले तरी त्यांचा दावा फोल ठरला आहे. सॅटेलाईटने आगीचे मुख्य ठिकाण वनकर्मचाऱ्यांना माहित होते. मात्र त्यासाठी मोठा अवधी लागत असल्याचे प्रत्यक्ष काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले. परिणामी माहिती येईपर्यंत आग उग्ररुप धारण करते.

मोझरी बिटमध्ये सोमवारी आग लागल्याची माहिती मिळाली. अंगारी कर्मचारी व गावकऱ्यांसह फायर ब्लोअरने आग विझविण्याचे कार्य सुरु आहे. आवश्यक आग संरक्षण ड्रेस मात्र अजून मिळाले नाही.
- डी. के.मुनेश्वर,
वनपरिक्षेत्र अधिकारी, चिखलदरा

Web Title: Mozilla valley forest firefighters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.