अंजनगाव सुर्जी : येथील अण्णाभाऊ साठे मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थाद्वारे संचालित चळवळ रक्तदान व रुग्ण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आजाराला बळी पडलेल्या वेडसर, निराधार व्यक्तीला उपचार मिळवून दिले.
अंजनगाव सुर्जी येथे वेडसर तेलुगू व्यक्ती पाच ते सहा वर्षांपासून वास्तव्यास आहे. काही दिवसांआधी त्या व्यक्तीच्या पायाला जखम झाली. त्यामध्ये अळ्या पडल्या होत्या. त्याच्याकडे अक्षय लोळे या युवकाचे लक्ष गेले. त्याने समितीचे अक्षय गवळी यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी सहकारी चेतन सारदे, अमोल पुकळे, आकाश फाटे, नितीन परकाले, अंकित सारंदे, सुनील गौर, विलास यांना घेऊन घटनास्थळ गाठले. अंजनगाव सुर्जी ग्रामीण रुग्णालयाच्या ॲम्बुलन्समध्ये अंकित सारंदे यांनी वेडसर व्यक्तीला वाहनात घेऊन रुग्णालयात आणले. डॉ. तरुण पटेल, कर्मचारी घोम, संजय वरुले यांनी औषोधोपचार केला. समिती सामाजिक कार्यात अग्रेसर आहे.