माझ्याशिवाय कोणालाच... जरबेचा अंत विषाच्या घोटाने

By प्रदीप भाकरे | Updated: August 11, 2023 16:59 IST2023-08-11T16:56:35+5:302023-08-11T16:59:47+5:30

प्रकृती स्थिर, दीड वर्षापासून पाठलाग : मुलगी अल्पवयीन, आरोपीला अटक

molestation of a minor girl from a one-sided love affair; She drank poison | माझ्याशिवाय कोणालाच... जरबेचा अंत विषाच्या घोटाने

माझ्याशिवाय कोणालाच... जरबेचा अंत विषाच्या घोटाने

अमरावती : माझ्याशिवाय अन्य कुणाशी बोलायचे नाही, कुणाला भेटायचे नाही, अशा एकतर्फी प्रेमातिरेकामधून एका अल्पवयीन मुलीची छेड काढण्यात आली. भररस्त्यात छेड काढल्याने तिने आत्मघाती निर्णय घेत विषाचा घोट घेतला. तिला तातडीने रुग्णालयात हलविल्याने तिचे प्राण वाचले. धामणगाव रेल्वे तालुक्यातील तळेगाव दशासर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात ९ ऑगस्ट रोजी दुपारी तीनच्या सुमारास ती घटना घडली.

याप्रकरणी, १६ वर्षीय पीडित मुलीच्या तक्रारीवरून तळेगाव दशासर पोलिसांनी आरोपी अभिषेक मनोज महल्ले (२१, रा. मलातपूर, ता. धामणगाव रेल्वे) याच्याविरुद्ध विनयभंग व पॉक्सोअन्वये गुन्हा दाखल केला. आरोपीचे गेल्या एक दीड वर्षापासून तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर एकतर्फी प्रेम आहे. त्यातून त्याने तिच्यावर हक्क गाजविण्यास सुरुवात केली. माझ्याशिवाय अन्य कुणाशीही बोलू नकोस, असा दम त्याने भरला. एक-दीड वर्षापूर्वी त्याच कारणातून त्याने तिला मारहाणदेखील केली होती. मात्र, त्यानंतरही त्याच्या वर्तनात बदल झाला नाही.

Web Title: molestation of a minor girl from a one-sided love affair; She drank poison