चिखलदऱ्यात मोबाईल टावर व पेट्रोल पंप पांढरा हत्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:11 IST2021-07-21T04:11:17+5:302021-07-21T04:11:17+5:30
चिखलदारा (अमरावती )लोकमत न्यूज नेटवर्क विदर्भाचे नंदनवन चिखलदरा येथे हजारो रुपये खर्च करून येणाऱ्या पर्यटकांसह प्रशासकीय यंत्रणेला अनेक सोयीसुविधांचा ...

चिखलदऱ्यात मोबाईल टावर व पेट्रोल पंप पांढरा हत्ती
चिखलदारा (अमरावती )लोकमत न्यूज नेटवर्क
विदर्भाचे नंदनवन चिखलदरा येथे हजारो रुपये खर्च करून येणाऱ्या पर्यटकांसह प्रशासकीय यंत्रणेला अनेक सोयीसुविधांचा अभाव पाहता नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे मोबाईलला रेंज नाही गाडीत पेट्रोल मिळत नसल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे
मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्यातील आदिवासीबहुल ग्रामीण भागात आजही मोबाईल नेटवर्क पोहोचलेत नाही परंतु तालुका मुख्यालय असलेल्या चिखलदरा शहरात दरवर्षी लाखो पर्यटक येतात हजारो रुपयांचा खर्च करून सुद्धा आवश्यक तर सुविधांचा अभाव मिळत असल्याने निराश मनाने जात असल्याची गंभीर चित्र आहे या संपूर्ण प्रकाराबद्दल स्थानिक व्यावसायिक व नागरिकांमध्ये असंतोष खदखदत असून त्याचा उद्रेक होण्याची भीती वर्तविण्यात येत आहे अत्यावश्यक सेवेत पदाधिकारी व प्रशासनाने तत्काळ दखल घेण्याची मागणी आहे
बॉक्स
पर्यटक ,शासकीय यंत्रणा त्रस्त
चिखलदरा शहरात जवळपास सर्वच खासगी मोबाईल कंपन्यांचे टावर आहे बीएसएनएल चे टावर भगवान भरोसे असले तरी खाजगी मोबाईलवर कंपन्यांवर जवळपास सर्वांचा विश्वास बसला आहे देशभरातील विविध भागातून येणाऱ्या पर्यटकांसाठी खाजगी मोबाईल कंपन्यांचे टावर डोकेदुखी ठरल्याने त्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे दुसरीकडे दस्तुरखद्द सर्वोच्च प्रशासकीय यंत्रणेचे कामकाजही ऑनलाइन नेटवर्क वर असल्याने सतत खंडित सेवा विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षणाचा खेळखंडोबा करणारी ठरली आहे
बॉक्स
पेट्रोलपंपवर काळा बाजार
शासनाने नियमानुसार खाजगी व्यक्तीला दिलेला पेट्रोल पंप मूळ मालकाने आतापर्यंत १५ पेक्षा अधिक नागरिकांना भाडेपट्टीवर चालविण्यासाठी दिला परंतु सतत पेट्रोल पंप बंद ठेवून पर्यटक स्थानिक नागरिक व तालुका मुख्यालय येणाऱ्या आदिवासींना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे वास्तव आहे महसूल यंत्रणेने कारवाई करून सुद्धा पेट्रोल व डिझेल संपल्याचे सांगून जास्त दरात काळया बाजाराने विक्री होत असल्याचे वास्तव नेहमीचे आहे