मोर्शी : वृद्धापकाळात मोतिबिंदू ही समस्या निर्माण होत असून, १११ व्यक्तीचे दृष्टीपटल धुरकट झाल्यामुळे त्याला स्पष्ट दिसत नव्हते. अशा १११ वृद्धांची नेत्रतपासणीअंती मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड झाली असून, त्यातील २६ जणांची शस्त्रक्रिया नागपूर येथे २० ऑगस्ट रोजी करण्यात आली. त्यांची आमदार देवेंद्र भुयार यांनी रविवारी भेट घेऊन आस्थेने विचारपूस केली.
मोर्शी विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र भुयार यांच्या पुढाकाराने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोर्शी तालुका व डॉ. महात्मे नेत्रपेढी रुग्णालय नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने मोर्शी येथे भव्य नेत्र तपासणी व मोफत शस्त्रक्रिया शिबिराचे घेण्यात आले होते. त्यामध्ये ३५० रुग्णांची तपासणी केली असता, १११ रुग्णांच्या डोळ्यांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याचे नियोजन करण्यात आले. त्यापैकी २६ रुग्णांची पहिली बॅच रुग्णसेवक अमर नागले यांच्यासोबत महात्मे नेत्रपेढी नेत्र रुग्णालय नागपूर येथे पाठवून त्यांच्यावर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली.
या रुग्णसेवेकरिता नगराध्यक्षा मेघनाताई मडघे, डॉ. प्रदीप कुऱ्हाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नरेंद्र जिचकार, मोहन मडघे, शहराध्यक्ष तमीज, राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहर अध्यक्ष अंकुश घारड, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके, बाजार समितीचे संचालक प्रकाश विघे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष हितेश साबळे, रुपेश मेश्राम, नगरसेविका विद्या ढवळे, प्रतिभा महल्ले, दीक्षा गवई, सुनीता कोहळे, मयूर राऊत, स्नेहा जाने, विनोद ढवळे, शेरखान, दिलीप गवई, आनंद तायडे, देवेंद्र खांडेकर, पंकज राऊत, राधेश्याम पैठणकर, बंटी नागले, राहुल धुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत ३५० रुग्णांची भव्य डोळे तपासणी व मोफत शस्त्रक्रिया शिबिर झाले. यावेळी आमदार देवेंद्र भुयार यांचे वृद्धांनी आभार मानले.