बलात्कारातून गर्भधारणा, रुग्णालयात झाला गर्भपात!

By प्रदीप भाकरे | Updated: September 2, 2023 14:48 IST2023-09-02T14:47:26+5:302023-09-02T14:48:44+5:30

आरोपी वरूडचा : पीडिता अल्पवयीन

Minor girl gets pregnant through rape, aborts in hospital | बलात्कारातून गर्भधारणा, रुग्णालयात झाला गर्भपात!

बलात्कारातून गर्भधारणा, रुग्णालयात झाला गर्भपात!

अमरावती : एका अल्पवयीन मुलीला बलात्कारातून गर्भधारणा होत, तिचा गर्भपात झाल्याची धक्कादायक घटना येथील स्त्री रूग्णालयात उघड झाली. १ सप्टेंबर रोजी सकाळी ९ च्या सुमारास तिचा गर्भपात झाल्याने तिच्यावर सुमारे तीन महिन्यापुर्वी झालेल्या शारीरिक अत्याचाराचे बिंग फुटले. याप्रकरणी पिडित अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी आरोपी राकेश युवनाते (२०, रा.धनोडी, ता. वरूड) याच्याविरूध्द बलात्कार व पॉक्सो अन्वये गुन्हा दाखल केला.

तक्रारीनुसार, पिडित व आरोपी राकेश हे नातेवाईक आहेत. पिडिताचे राकेशशी प्रेमसंबंध असून, त्या संबंधांतून त्यांच्यात पुढे शारिरिक संबंध निर्माण झाले. त्यातून तिला गर्भधारणा झाली. ती बाब तिने राकेशच्या कानावर घातली. त्यावेळी आरोपी राकेशने तिला लग्न करू, असा विश्वास दिला. मात्र काही दिवसांपुर्वी तिची प्रकृती बिघडल्याने तिला एका रूग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे ती तीन महिन्यांची गर्भवती असल्याचे निदान डॉक्टरांनी केले.

पुढील उपचारासाठी तिला अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे १ सप्टेंबर रोजी तिचा गर्भपात झाला. त्यामुळे गाडगेनगर पोलिसांसह बाल संरक्षण कक्षाला माहिती देण्यात आली. गाडगेनगर पोलिसांनी जिल्हा स्त्री रूग्णालय गाठून पिडिताचे बयान नोंदविले. त्यातून सारा प्रकार उघड झाला.

Web Title: Minor girl gets pregnant through rape, aborts in hospital