अल्पवयीन मुुलगी चार महिन्यांची गर्भवती; आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल
By प्रदीप भाकरे | Updated: June 21, 2023 13:20 IST2023-06-21T13:20:44+5:302023-06-21T13:20:59+5:30
गतवर्षी दोघांची ओळख झाली. त्यातून आरोपीने तिच्याशी प्रेमसंबंध वाढवले.

अल्पवयीन मुुलगी चार महिन्यांची गर्भवती; आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल
अमरावती : धारणी तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीला बलात्कारातून चार महिन्यांची गर्भधारणा झाली. २० जून रोजी हा प्रकार उघड झाला. याप्रकरणी धारणी पोलिसांनी २० जून रोजी सायंकाळी आरोपी रोहित रायसिंग उईके (२०, रा. बोड, ता. धारणी) याच्याविरूद्ध बलात्कार व पोस्कोअन्वये गुन्हा दाखल केला.
आरोपी हा धारणी येथील आयटीआयचा विद्यार्थी आहे. गतवर्षी दोघांची ओळख झाली. त्यातून आरोपीने तिच्याशी प्रेमसंबंध वाढवले. दरम्यान तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अतिप्रसंग केला. काही दिवसांपुर्वी तिचे पोट दुखत असल्याने तिला दवाखान्यात दाखविण्यात आले. तपासणीदरम्यान ती चार महिन्यांची गर्भवती असल्याचे निदान डॉक्टरांनी केले. ती माहिती रूग्णालय प्रशासनाकडून बाल संरक्षण अधिकाऱ्यांसह पोलीस प्रशासनाला देण्यात आली. पोलिसांनी डॉक्टरांच्या उपस्थितीत तिचे बयाण नोंदविले. तथा २० जून रोजी सायंकाळी सातच्या सुमारास आरोपी रोहित उईकेविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.