शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
2
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
3
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
4
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
5
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
6
इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
7
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
8
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
9
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
10
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
11
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
12
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
13
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
14
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
15
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
16
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
17
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
18
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
19
Harsha Richhariya : "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान
20
"माझी मुलं श्रेयस अय्यरला हाक मारताना..."; प्रिती झिंटाने IPLच्या 'सरपंच'बद्दल केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

अल्पभूधारक शेतकऱ्यांना दुप्पट वीज देयक !

By admin | Updated: January 8, 2017 00:19 IST

अत्यल्पभूधारक उपसा पंपधारक शेतकऱ्यांना वीजदरात सवलत देण्याची मागणी होत आहे.

नवे संकट : महावितरणचा ऐन थंडीत शॉकरोशन कडू तिवसाअत्यल्पभूधारक उपसा पंपधारक शेतकऱ्यांना वीजदरात सवलत देण्याची मागणी होत आहे. ती अव्हेरून या शेतकऱ्यांना दामदुप्पट दराने वीज बिल देण्यात आलेली आहे. यामुळे आधीच आर्थिक संकटात असलेला शेतकरी त्रस्त झाला आहे. शेतीसाठी विजेचा दर सातत्याने चर्चेत राहिला आहे. आता तर मागील महिन्यात कृषी उपसा पंपाची वीजबिले दुप्पटीने आली आहेत. त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणावर आर्थिक संकटात सापडला आहे. मध्यंतरीच्या काळात वीज नियामक मंडळाने ९ हजार कोटींच्या वीज दरवाढीस मंजुरी दिली. याचा सर्वाधिक फटका कृषी उपसा वीजपंप धारकांना बसला आहे. विद्युत नियामक आयोगाच्या मंजुरीनंतर नोव्हेंबर महिन्यापासून सुधारित दरवाढ लागू करण्यात आली. ही वाढीव दराची बिले आता शेतकऱ्यांना देण्यात आली आहे. वीज बिलामधील काही रक्कम शासन शेतकऱ्यांना अनुदान स्वरुपात देते. ही अनुदानाची रक्कम वजा जाता दुप्पट दरवाढीचा बोजा मात्र कायम राहत आहे. शासनाने ही वीज दरवाढ करताना पूर्ण दाबाचे वीजपुरवठा करावा, ही शेतकऱ्यांची मागणी दुर्लक्षित राहिली आहे. यामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. विद्युत भारनियमन व कमी भारातील विजेच्या खेळखंडोबामुळे रबीचे सिंचन कसे करावे, असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे. त्यातच दामदुप्पट दरातील वीज बिलांमुळेही शेतकरी अडचणीत सापडले आहे. शेतीचे वीज युनिट ३.३२ रुपयांच्या घरातयापूर्वीच्या सरकारच्या काळात शेतीपंपासाठी वीज नियामक मंडळाने प्रतियुनिट दोन रुपये ८८ पैसे दर निश्चित केला होता. त्याला विरोध झाल्यानंतर या दरामधील ७२ पैसे शेतकऱ्यांनी भरायचे उर्वरित २.१६ पैसे शासनाने अनुदान स्वरुपात देण्याचा निर्णय झाला होता. सन २०१४-१५ पर्यंत हे प्रमाण २५ ते ४४ टक्के या प्रमाणात होते. मात्र, १ जून २०१५ पासून राज्य शासनाने २.८८ या दरात ४४ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला. या वाढीनुसार शेतीची वीज ३.३२ रुपयांपर्यंत पोहोचली आहे.