शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

अमरावतीत मेफेड्रोन प्रकरणाचे गांभीर्य वाढले; ७.५ कोटींच्या एमडीसह चौघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 12:53 IST

Amravati : आरोपींमध्ये अमरावतीच्या सधन कुटुंबातील तरुणांचा समावेश; तीन दिवसांचा एमसीआर

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अहमदाबाद येथील डायरेक्टोरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स (डीआरआय) च्या पथकाने रविवारी (दि. १) दुपारी नवसारी चांगापूर रिंगरोडवर धडक कारवाई करत सुमारे ७.५ कोटी रुपये किमतीचे मेफेड्रोन जप्त केल्यानंतर, आता या रॅकेटमधील आरोपींची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या रॅकेटमध्ये सहभागी असलेले आरोपी केवळ गुन्हेगारी पार्श्वभूमीचे नसून शहर व जिल्ह्यातील सधन कुटुंबांतील तरुण असल्याचे तपासात समोर आले आहे. सोमवारी (दि. २) आरोपींना स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

फैजल खान अन्सार खान (२२, रा. गुलिस्ता नगर, अमरावती), आवेज अहमद आरिफ अहमद (२५, रा. चांदूरबाजार), मुस्तकीम खान अब्दुल ताहीर खान (२९, रा. चांदूरबाजार) व शेख परवेज शेख नासिर (३२, रा. चांदणी चौक, हाथीपुरा, 33 अमरावती) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. या चौघांनाही रविवारी रात्री वैद्यकीय तपासणीनंतर सोमवारी दुपारी अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी ए. एल. सराफ यांच्या न्यायालयासमोर हजर करण्यात आले. चारही आरोपींकडून ४ किलो ९०२ ग्रॅम एमडी, ४ ग्रॅम गांजा, कार जप्त करण्यात आली. नवसारी चांगापूरस्थित व्हीआरएल ढाब्याजवळ १ फेब्रुवारी रोजी दुपारी १२.४५ च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

घटनास्थळाहून तीन आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर डीआरआयने गुलिस्तानगर येथून फैजल खान याला ताब्यात घेतले. याप्रकरणात अद्यापही एफआयआर दाखल झालेला नाही किंवा स्थानिक पोलिसांनादेखील माहिती देण्यात आली नाही. ५ किलो एमडीचा साठा आरोपींच्या कारमधून जप्त करण्यात आला. आरोपींकडून जप्त सुमारे ५ किलो एमडी ड्रग्जची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ७.५ कोटी रुपये असल्याचे डीआरआयच्या वकिलांकडून न्यायालयात सांगण्यात आले.

संशयाची सुई आता बड्या माशांकडे

  • ही केवळ एक छोटी जप्ती नसून अमरावतीत एमडी ड्रग्जचे जाळे किती खोलवर रुजले आहे, याचे हे जिवंत उदाहरण आहे. कारंजा घाडगे येथील प्रकरणाशी या प्रकरणाचा काहीही संबंध नसला, तरी अमरावती शहरात इतक्या मोठ्या प्रमाणात साठा सापडणे हे धक्कादायक आहे.
  • अटक आरोपींच्या वतीने अॅड. मूर्तिजा आझाद यांनी बाजू मांडली, तर २ डीआरआयच्या वतीने अॅड. कुणाल नालमवार यांनी युक्तिवाद केला.

 

ड्रग्स नेटवर्क उधळणार

डीआरआयच्या पथकाने रविवार (दि. १ पासून नवसारी येथील जीएसटी भवनालाच तपासाचे मुख्य केंद्र बनवले आहे. याच ठिकाणाहून प्रकरणाचे धागेदोरे शोधण्याचे काम सुरू आहे. या तरुणांचे ड्रग्ज नेटवर्क नेमके कुठे आणि कुणाशी जोडलेले आहे, एवढा मोठा साठा त्यांनी नेमका कुठून आणला आणि या संपूर्ण रॅकेटचा मास्टरमाइंड कोण, याचा उलगडा करण्याचे मोठे आव्हान डीआरआयसमोर आहे. तपास याच दिशेने पुढे सरकत आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Amravati Mephedrone Case Deepens: Four Arrested with ₹7.5 Crore MD

Web Summary : Amravati's mephedrone case intensifies as four individuals, including those from affluent backgrounds, were arrested with ₹7.5 crore worth of MD. The investigation aims to uncover the drug network's roots and mastermind, with authorities focusing on tracing connections and the source of the drugs.
टॅग्स :AmravatiअमरावतीDrugsअमली पदार्थCrime Newsगुन्हेगारी