शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाट व्याघ्र प्रकल्प झाला ४३ वर्षांचा

By admin | Updated: February 23, 2017 00:16 IST

राज्यात दुसऱ्या क्रमांकाचा मेळघाट व्याघ्र प्रकल्प बुधवारी ४३ वर्षांचा झाला असून वाघांचे संरक्षण, संवर्धनासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी शपथ घेतली.

व्याघ्रस्थापना दिन : उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा गौरव अमरावती : राज्यात दुसऱ्या क्रमांकाचा मेळघाट व्याघ्र प्रकल्प बुधवारी ४३ वर्षांचा झाला असून वाघांचे संरक्षण, संवर्धनासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी शपथ घेतली. व्याघ्रस्थापना दिनाचे औचित्य साधून उल्लेखनिय कामगिरी बजावणाऱ्यांचा गौरव करण्यात आला.येथील व्याघ्र प्रकल्पाच्या कुलाढाप सभागृहात आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एन.रामबाबू होते. प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य वनसंरक्षक संजीव गौड, मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक एम.एस.रेड्डी उपस्थित होते. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची निर्मिती, विस्तारलेला परिसर, वाघांची वाढती संख्या, व्याघ्र प्रकल्पातील गावांचे पुनर्वसन, व्याघ्रतस्करी आदींबाबत मंथन करण्यात आले. अद्यापही काही गावांचे पुनर्वसन करायचे असून त्याकरिता निधीची वानवा असल्याची बाब नमूद करण्यात आली. वाघांचे संरक्षण, संवर्धन ही काळाची गरज असून त्याकरिता केंद्रशासन आग्रही असल्याचे एन. रामबाबू यांनी सांंगितले. मागील दोन वर्षांपासून मेळघाटात वाघांची संख्यावाढ ही आनंदाची बाब आहे. मात्र त्या तुलनेत स्थानिकांचा वावर, व्याघ्र प्रकल्पातून वाहतूक ही बाब धोकादायक असल्याचे रेड्डी यांनी सांगितले. व्याघ्र प्रकल्पासाठी अतुलनीय कामगिरी बजावणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना वरिष्ठांच्या हस्ते गौरविण्यात आले. यात सर्वेक्षक विलास देशमुख, एम.एस. झांजुर्णे, एम.एच.खान, एस.एस.बेठेकर, आर. डी.चक्रे,वनमजूर येवले, के.वाय. लोखंडे, के.एन.गुप्ता, बी.सी. भिलावेकर, अनिता बेलसरे, पी.आर. पाटील, के.ए.मेश्राम, पंजाब गवई, जी.डी.रघुवंशी, प्रदीप बाळापुरे, रवि इवनाते, तुषार पवार, अल्केश ठाकरे, आदींना भेटवस्तू, प्रमाणपत्र देऊन गौरविले. तसेच व्याघ्र प्रकल्पासाठी चांगली कामगिरी केल्याबद्दल शहानूर, दाबिया व चुनखडी ग्राम परिसर विकास समितीला गौरविण्यात आले आहे. (प्रतिनिधी)