विद्यापीठाच्या कारभाराबाबत राज्यपालांना भेटणार
By Admin | Updated: April 27, 2015 00:03 IST2015-04-27T00:03:29+5:302015-04-27T00:03:29+5:30
अमरावती विद्यापीठाच्या प्रशासकीय, विकासात्मक, विद्यार्थी उपयोगी तसेच भ्रष्टाचाराच्या मुद्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी..

विद्यापीठाच्या कारभाराबाबत राज्यपालांना भेटणार
पत्रपरिषद : विद्यापीठ शिक्षण मंचने घेतली राजभवनातून अनुमती
अमरावती : अमरावती विद्यापीठाच्या प्रशासकीय, विकासात्मक, विद्यार्थी उपयोगी तसेच भ्रष्टाचाराच्या मुद्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्यपालांशी चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ शिक्षण मंचाचे अध्यक्ष प्रदीप खेडकर यांनी रविवारी पत्रपरिषदेत दिली. तशी अनुमती मिळाल्याचेही त्यांनी सांगितले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ व संत गाडगे महाराज अमरावती विद्यापीठातील प्राध्यापकांचा संयुक्त मेळावा ३ मे रोजी नागपूर येथे आयोजित करण्यात आला आहे. मेळाव्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवर, उच्च व शिक्षणमंत्री विनोद तावडे उपस्थित राहणार असल्याचे खेडकर यांनी सांगितले. सिनेट निवडणुकीसंदर्भात २९ एप्रिल रोजी विभागातील शिक्षक व विविध क्षेत्रामधील मान्यवरांची बैठक आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी प्रदीप खेडकर, दीपक धोटे, दिनेश सूर्यवंशी, राजेश जयपूरकर, पी.एन. मुलकरवार, डी.टी. इंगोले, रवींद्र कडू, रवींद्र खांडेकर, जयंत कावरे, जे.एस. देशपांडे, विलास उभाड, संजय काळे, राजेंद्र हावरे, अजय बोंडे, दिनेश सातंगे, चंद्रशेखर सावरकर उपस्थित होते. विद्यापीठात सुरू असलेल्या गैर व्यवस्थापनाबाबत या भेटीदरम्यान राज्यपालांसमवेत आवर्जून चर्चा केली जाईल. (प्रतिनिधी)