अमरावती एमआयडीसीत केमिकल फॅक्टरीला भीषण आग
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2021 12:31 IST2021-08-28T12:28:26+5:302021-08-28T12:31:19+5:30
Amravati Fire : आग विझवण्यासाठी महापालिका अग्निशमन विभागाने आठ बंबाच्या साह्याने आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला.

अमरावती एमआयडीसीत केमिकल फॅक्टरीला भीषण आग
अमरावती : जुन्या बायपासलगतच्या एमआयडीसीत शनिवारी मध्यरात्री २ वाजता केमिकल फॅक्टरीला भीषण आग लागली. आग विझविण्यासाठी सकाळी ९ वाजतापर्यंत अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. आगीचा धूर २ किलोमीटर अंतरावरून दिसून येत होता. आकाशात सर्वत्र काळा धूर पसरला होता.
आग विझवण्यासाठी महापालिका अग्निशमन विभागाचने आठ बंबाच्या साह्याने आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. आगीची पाहणी करण्यासाठी महापालिका आयुक्त प्रशांत रोडे घटनास्थळी पोहचले होते. आगीत किती लाखांचे नुकसान झाले, याचे ऑडिट अग्निशमन विभाग करीत असल्याची माहिती आहे.