गोठ्यातून ‘तो’ तिच्याकडे श्वापदासारखा बघायचा, गुन्हा दाखल

By प्रदीप भाकरे | Updated: May 29, 2023 15:30 IST2023-05-29T15:29:03+5:302023-05-29T15:30:52+5:30

त्याबाबत तिने त्याला अनेकदा हटकले. मात्र, तो मानायला तयार नाही.

man used to look at her like a beast from the manger! | गोठ्यातून ‘तो’ तिच्याकडे श्वापदासारखा बघायचा, गुन्हा दाखल

गोठ्यातून ‘तो’ तिच्याकडे श्वापदासारखा बघायचा, गुन्हा दाखल

अमरावती : बकऱ्यांच्या गोठ्यातून आरोपी हा आपल्याकडे एकसारखा वाईट नजरेने पाहत असल्याची तक्रार एका महिलेने बडनेरा पोलिस ठाण्यात नोंदविली आहे. या प्रकरणी २८ मे रोजी पोलिसांनी आरोपी शेख अन्सार शेख गफूर (४०, रा. अंजनगाव बारी) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

गेल्या तीन महिन्यांपासून आरोपी हा त्याच्या दुचाकीने पाठलाग करतो, वाईट नजरेने पाहत असल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे. त्याबाबत तिने त्याला अनेकदा हटकले. मात्र, तो मानायला तयार नाही.

दरम्यान, २८ मे रोजी सकाळी ९:३० च्या सुमारास फिर्यादी महिला स्वत:च्या कामात गर्क असताना आरोपी तिच्याकडे एकटक बघत असल्याचे तिच्या लक्षात आले. त्याच्या या नेहमीच्या त्रासाला कंटाळून ती घराबाहेर आली व त्याला जाब विचारला. ‘माझ्या घरात वाकून का बघतोस,’ अशा शब्दात त्याला हटकले असता, त्याने ‘तुला काय करायचे ते कर, मी पाहून घेईन,’ अशी धमकी दिली. त्यामुळे महिलेने दुपारी थेट बडनेरा पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
 

Web Title: man used to look at her like a beast from the manger!