धक्कादायक! महिलेचे न्यूड फोटो तिच्याच मुलीला पाठविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2021 18:14 IST2021-12-28T18:00:51+5:302021-12-28T18:14:52+5:30

आरोपीने पीडिता शेतात काम करत असताना तिचा विनयभंग करून तिच्यावर बलात्कार केला, अश्लील छायाचित्र काढून शरीरसंबंधाचे छायाचित्रण केले. व ते मुलीला व नातेवाईकांना पाठविण्याची धमकी देऊन पीडितेचे वारंवार शोषण केले.

man raped woman and Send nude photos of the woman to her own daughter | धक्कादायक! महिलेचे न्यूड फोटो तिच्याच मुलीला पाठविले

धक्कादायक! महिलेचे न्यूड फोटो तिच्याच मुलीला पाठविले

ठळक मुद्देवारंवार अतिप्रसंग, बळजबरीने अश्लील चित्रण पथ्रोट ठाण्याच्या हद्दीतील घटनाआरोपीवर गुन्हा दाखल

अमरावती : एका महिलेशी केलेल्या शारीरिक बळजबरीदरम्यानच्या छायाचित्रांसह तिची न्यूड छायाचित्रे तिच्याच मुुलीला पाठविल्याची धक्कादायक घटना सोमवारी उघड झाली. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून पथ्रोट पोलिसांनी आरोपी मो. सोहेल मो. शकील (२२, रा. काकडा, ता. अचलपूर) याच्याविरुद्ध बलात्कार, ॲट्राॅसिटी व माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारीनुसार ४० वर्षीय पीडितेच्या पतीचे चार वर्षांपूर्वी निधन झाले. ती तिच्या दोन मुलांसह राहते. दरम्यान शेतीकामाच्या माध्यमातून तिची सहा महिन्यांपूर्वी आरोपीशी भेट झाली. ती अन्य मजूर महिलांना घेऊन मो. सोहेलच्या ऑटोने लगतच्या गावातील शेतात जात होती. त्यातून त्याने प्रेमसंबंध निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्याला पीडितेने नकार दिला. दरम्यान सहा महिन्यांपूर्वी पीडिता ही एका शेतात असताना त्याने तिचा विनयभंग करून तिच्यावर बलात्कार केला. त्याने तिचे अश्लील छायाचित्र काढली. शरीरसंबंधाचे देखील छायाचित्रण केले. ते मुलीला व नातेवाईकांना पाठविण्याची धमकी देऊन त्याने पीडितेचे वारंवार शोषण केले.

त्याने गाठला निर्लज्जतेचा कळस

आरोपीने तिला धमकी देऊन अनेकदा शोषण केले. मुलगी समजदार असल्याने तिने त्या घटनेची कुठेही वाच्यता केली नाही. मात्र आरोपीने काही दिवसांपूर्वी पीडितेचे अश्लील व आक्षेपार्ह छायाचित्रे तिच्याच मुलीच्या व अन्य नातेवाईकांच्या मोबाईलवर टाकले. त्यामुळे पीडिताची सामाजिक बदनामी झाली. आरोपी तेवढ्यावरच थांबला नाही, तर पीडिताच्या नातेवाईकांच्या घरी जाऊन त्याने ती छायाचित्रे त्यांना दाखविली. त्या बदनामी व त्रासाला कंटाळून अखेर तिने २७ डिसेंबर रोजी सायंकाळी पथ्रोट पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली.

Web Title: man raped woman and Send nude photos of the woman to her own daughter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.