चक्क अंडर वेअरवर तो महिलेच्या खोलीत शिरला!  पतीने हटकले तरी,  परतवाडा ठाण्याच्या हद्दीतील घटना

By प्रदीप भाकरे | Updated: June 4, 2023 13:20 IST2023-06-04T13:07:42+5:302023-06-04T13:20:21+5:30

संबंधित महिलेच्या पतीने हटकल्यानंतरही एक विकृत व्यक्ती तिच्या घरात चक्क केवळ अंडर गारमेंटवर शिरला.

man entered the woman's room in underwear! Even if the husband asks, the incident within the limits of Patrwada Thane | चक्क अंडर वेअरवर तो महिलेच्या खोलीत शिरला!  पतीने हटकले तरी,  परतवाडा ठाण्याच्या हद्दीतील घटना

चक्क अंडर वेअरवर तो महिलेच्या खोलीत शिरला!  पतीने हटकले तरी,  परतवाडा ठाण्याच्या हद्दीतील घटना

अमरावती: महिला, तरूणींवरील अत्याचाराचा टक्का अलिकडे अधिक वाढू लागला असताना विनयभंगाच्या घटनांमध्ये देखील कमालीची वाढ झाली आहे. अशीच एक विनयभंगाची घटना परतवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ३ जून रोजी उघड झाली. संबंधित महिलेच्या पतीने हटकल्यानंतरही एक विकृत व्यक्ती तिच्या घरात चक्क केवळ अंडर गारमेंटवर शिरला. याप्रकरणी रात्री उशिरा त्या विकृताविरूध्द विनयभंग, मारहाण व शिविगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. उमेश रघुनाथ जवंजाळ (४४, रा. अंजनगाव सुर्जी, ह.मु. परतवाडा) असे आरोपीचे नाव आहे.

 तक्रारीनुसार, ३ जून सायंकाळी ७ च्या सुमारास संबंधित महिला ही घरी एकटी असताना आरोपी उमेश जवंजाळ हा चडडी बनियानवर फिर्यादी महिलेच्या खोलीकडे जात होता. तेवढयात फिर्यादी महिलेचे पती आले. त्यांनी ते पाहिले. मी घरी नसताना माझ्या घराकडे अशाप्रकारे का जात आहेस, असा जाब विचारत त्यांनी त्याला हाकलून दिले व ते हात पाय धुण्यासाठी बाथरूममध्ये गेले. त्यावेळी उमेश जवंजाळ हा फिर्यादी महिलेच्या खोलीत अर्धनग्न स्थितीत शिरला. त्यामुळे महिला जोरात ओरडली. त्यामुळे तिच्या पतीने बाथरूमबाहेर धाव घेत आरोपीला जाब विचारत पुन्हा हाकलले.

Web Title: man entered the woman's room in underwear! Even if the husband asks, the incident within the limits of Patrwada Thane