​अमरावतीत 'डीआरआय'ची मोठी कारवाई; ५ किलो 'एमडी' ड्रग्जसह आरोपी ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2026 19:31 IST2026-02-01T19:31:38+5:302026-02-01T19:31:52+5:30

या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली असून ड्रग्ज माफियांचे धागेदोरे पुन्हा एकदा समोर आले आहेत.

Major operation by 'DRI' in Amravati; Accused arrested with 5 kg 'MD' drugs | ​अमरावतीत 'डीआरआय'ची मोठी कारवाई; ५ किलो 'एमडी' ड्रग्जसह आरोपी ताब्यात

​अमरावतीत 'डीआरआय'ची मोठी कारवाई; ५ किलो 'एमडी' ड्रग्जसह आरोपी ताब्यात

अमरावती:महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) रविवारी दुपारी अमरावती शहरात अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई केली. गाडगे नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका फ्लॅटवर छापा टाकून पथकाने सुमारे ५ किलो एमडी (मेफेड्रॉन) जप्त केले आहे. या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली असून ड्रग्ज माफियांचे धागेदोरे पुन्हा एकदा समोर आले आहेत.

​कारंजा लाड प्रकरणाशी कनेक्शन?

सुमारे महिन्याभरापूर्वी कारंजा लाड येथे डीआरआयने १९८ किलो एमडी जप्त केले होते. या प्रकरणाच्या तपासात अमरावतीमधील धागेदोरे हाती लागल्याने ही गुप्त मोहीम राबवण्यात आली. जप्त करण्यात आलेला मुद्देमाल आणि ताब्यात घेतलेल्या आरोपीला घेऊन डीआरआयचे पथक नवसारी येथील जीएसटी भवन येथे पोहोचले आहे. तिथे आरोपीची कसून चौकशी सुरू असून फॉरेन्सिक व्हॅनद्वारे पुराव्यांची तपासणी केली जात आहे.

​स्थानिक पोलिसांनाही नव्हती माहिती

विशेष म्हणजे, ही कारवाई अत्यंत गोपनीयरीत्या करण्यात आली. स्थानिक गाडगे नगर पोलिसांनाही याबाबत कोणतीही पूर्वकल्पना देण्यात आली नव्हती. सध्या जीएसटी भवनचे प्रवेशद्वार बंद करण्यात आले असून प्रसारमाध्यमे आणि बाहेरील व्यक्तींना प्रवेश नाकारण्यात आला आहे.

​सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डीआरआयची चौकशी पूर्ण झाल्यानंतर या प्रकरणी गाडगे नगर पोलीस ठाण्यात रीतसर एफआयआर  दाखल करण्याची प्रक्रिया पार पडेल. या कारवाईमुळे आंतरजिल्हा ड्रग्ज रॅकेटचे मोठे जाळे उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान दुपारी 4.30 च्या सुमारास डीआरआयचे एक पथक जीएसटी भवन येथून निघून कारवाईसाठी निघाल्याची माहिती आहे. 

Web Title : अमरावती में डीआरआई की बड़ी कार्रवाई, 5 किलो एमडी ड्रग्स जब्त, आरोपी गिरफ्तार

Web Summary : डीआरआई ने अमरावती में 5 किलो एमडी ड्रग्स जब्त कर एक संदिग्ध को गिरफ्तार किया। यह कार्रवाई कारंजा लाड में हुई पिछली जब्ती से जुड़ी है और स्थानीय पुलिस से गुप्त रखी गई थी। आगे की जांच जारी है, जिससे एक बड़े ड्रग नेटवर्क का पर्दाफाश हो सकता है।

Web Title : DRI Busts Drug Racket in Amravati, Seizes 5kg MD

Web Summary : DRI seized 5 kg of MD drugs in Amravati, arresting a suspect. The raid, linked to a prior seizure in Karanja Lad, was kept secret from local police. Further investigation continues, potentially exposing a larger drug network.