दहावीच्या परीक्षेत मोठा गैरप्रकार; अंजनगाव सुर्जी येथे परिरक्षकासह पाच जणाविरुद्ध गुन्हा दाखल, दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2026 13:10 IST2026-03-01T13:09:33+5:302026-03-01T13:10:11+5:30

दहावीच्या परीक्षा प्रक्रियेत अत्यंत खळबळजनक प्रकार समोर आला असून, इंग्रजी विषयाच्या उत्तरपत्रिका कस्टडीत जमा न करता त्या खाजगी इसमाकडे लपवून ठेवल्याप्रकरणी अंजनगाव सुर्जी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.

Major malpractice in 10th class exam; Case registered against five people including custodian in Anjangaon Surji, two arrested | दहावीच्या परीक्षेत मोठा गैरप्रकार; अंजनगाव सुर्जी येथे परिरक्षकासह पाच जणाविरुद्ध गुन्हा दाखल, दोघांना अटक

दहावीच्या परीक्षेत मोठा गैरप्रकार; अंजनगाव सुर्जी येथे परिरक्षकासह पाच जणाविरुद्ध गुन्हा दाखल, दोघांना अटक

प्रदीप भाकरे 
​अमरावती :
दहावीच्या परीक्षा प्रक्रियेत अत्यंत खळबळजनक प्रकार समोर आला असून, इंग्रजी विषयाच्या उत्तरपत्रिका कस्टडीत जमा न करता त्या खाजगी इसमाकडे लपवून ठेवल्याप्रकरणी अंजनगाव सुर्जी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी मुख्य परिरक्षकासह तीन ज्ञात इसम आणि दोन अज्ञात विद्यार्थ्यांविरुद्ध बीएनएस आणि महाराष्ट्र परीक्षा गैरप्रकार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांना शनिवारी उशिरा रात्री अटक करण्यात आली आहे.

 इयत्ता दहावीच्या इंग्रजी विषयाची परीक्षा पार पडल्यानंतर सोडवलेल्या उत्तरपत्रिका विहित वेळेत कस्टडीमध्ये जमा करणे बंधनकारक होते. मात्र, आरोपींनी संगनमत करून दोन उत्तरपत्रिका कस्टडीत जमा न करता त्या एका खाजगी इसमाकडे लपवून ठेवल्या. परीक्षेच्या पवित्रतेचा भंग करून गैरहेतूने हा प्रकार करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

​उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा परिषद अमरावती रजनी शिरभाते यांनी दिलेल्या तक्रारीवरून या आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे: परिरक्षक ​सुधीर द. खोडे, उप परिरक्षक ​सुशीलकुमार अभ्यंकर व ​अनिल हाडोळे या खाजगी इसमासह ​दोन अज्ञात विद्यार्थीविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला. यातील खोडे व हाडोळे यांना अटक करण्यात आली आहे.

Web Title : 10वीं की परीक्षा में बड़ी धोखाधड़ी; पांच पर मामला दर्ज, दो गिरफ्तार

Web Summary : अंजनगांव सुरजी में 10वीं बोर्ड परीक्षा में बड़ी धोखाधड़ी का मामला सामने आया है। मुख्य पर्यवेक्षक सहित पांच लोगों पर उत्तर पुस्तिकाएं छिपाने का मामला दर्ज किया गया है। परीक्षा नियमों का उल्लंघन करने पर दो गिरफ्तार।

Web Title : Major Cheating in 10th Exam; Five Booked, Two Arrested

Web Summary : A major cheating scandal in the 10th board exam has surfaced in Anjangaon Surji. Five individuals, including the chief supervisor, have been booked for concealing answer sheets. Two have been arrested for violating exam regulations.