अमरावती जिल्हा परिषद महाविकासआघाडीकडे; काँग्रेसचे बबलू देशमुख अध्यक्ष, सेनेचे विठ्ठल चव्हाण उपाध्यक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2020 22:18 IST2020-01-06T22:15:11+5:302020-01-06T22:18:54+5:30
विरोधी पक्षात असलेल्या भाजपने या दोन्ही पदांसाठी उमेदवार दिले नाहीत.

अमरावती जिल्हा परिषद महाविकासआघाडीकडे; काँग्रेसचे बबलू देशमुख अध्यक्ष, सेनेचे विठ्ठल चव्हाण उपाध्यक्ष
अमरावती : स्थानिक जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना महाविकास आघाडीने भाजपला सत्तेबाहेर ठेवले. ६ जानेवारी ही निवडणूक घेण्यात आली. अध्यक्षपदी काँग्रेस जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख व उपाध्यक्षपदी शिवसेनेचे विठ्ठल चव्हाण यांची अविरोध निवड झाली. विरोधी पक्षात असलेल्या भाजपने या दोन्ही पदांसाठी उमेदवार दिले नाहीत.
महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर, आमदार बळवंत वानखडे, माजी आमदार वीरेंद्र जगताप, काँग्रेसचे जिल्हा निरीक्षक रवींद्र दरेकर, शिवसेनेच्या प्रीती बंड, जिल्हाप्रमुख श्याम देशमुख, सुनील खरोटे, राजेश वानखडे, नाना वानखडे प्रामुख्याने उपस्थित होते.