शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र निवडणूक 2019: "शरद पवारांनी मुख्यमंत्री व्हावे, आमचा त्यांना पाठिंबा"

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2019 17:50 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार मुख्यमंत्री होत असतील, तर काँग्रेसचा त्या निर्णयास पाठिंबा असेल, असे मत काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्ष तथा तिवसा मतदारसंघाच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी रविवारी येथे व्यक्त केले.

- सूरज दाहाटतिवसा (अमरावती) : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार मुख्यमंत्री होत असतील, तर काँग्रेसचा त्या निर्णयास पाठिंबा असेल, असे मत काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्ष तथा तिवसा मतदारसंघाच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी रविवारी येथे व्यक्त केले. प्रदेश काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देण्याच्या मानसिकतेत असल्याचे वृत्त येत असताना ठाकूर यांनी पवारांच्या मुख्यमंत्रिपदाबाबत मोठे वक्तव्य केले आहे. परतीच्या पावसाने तालुक्यात झालेल्या नुकसानाची पाहणी करत असताना रविवारी त्यांनी यावली येथील एका शेतातून फेसबुक लाईव्ह केले.शिवसेनेच्या सत्तेच्या समसमान वाटपाच्या आग्रहामुळे राज्यातील सत्तास्थापनेचा गाडा अडकला आहे. शिवसेना मागणीवर ठाम असताना भाजपाकडून मुख्यमंत्रिपदासह समसमान वाटपावर कोणतीही तडजोडीची भूमिका घेतली जाताना दिसत नाही. मात्र, भाजपा-शिवसेनेतील तणावामुळे नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. राज्यात पुन्हा ‘पुलोद’सारखा राजकीय प्रयोग होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राष्ट्रवादीचे विधिमंडळातील गटनेते अजित पवारांनी केलेल्या सूचक वक्तव्यामुळे शरद पवारांसह अन्य दोन नेत्यांची नावे मुख्यमंत्रिपदासाठी चर्चेत आली आहेत. त्यापार्श्वभूमीवर ठाकूर यांच्या विधानाला महत्त्व प्राप्त झाले आहे. सरकार आमचे का तुमचे, या वादात गुंतलेल्या भाजपने शेतक-यांकडे लक्ष द्यावे, धमकी, कुवत, गुर्मी अशी टीका टिप्पणी बंद करा, इतकी गुर्मी कामाची नाही. सरळ शरद पवार यांना मुख्यमंत्री बनवा. काँग्रेस त्यांना पाठिंबा देईल, असा पुनरुच्चार त्यांनी केला. शेतक-यांना नुकसानभरपाई म्हणून हेक्टरी ५० हजार रुपये भरपाई द्या, अशी मागणीही त्यांनी केली.

टॅग्स :congressकाँग्रेसMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपाShiv Senaशिवसेना