Maharashtra Election 2019 ; बच्चू कडू यांचे चांदूरबाजार येथे शक्तिप्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2019 06:00 AM2019-10-20T06:00:00+5:302019-10-20T06:00:53+5:30

चांदूरबाजार शहरातून निघालेल्या या प्रचार रॅलीने नानोरी, सोनोरीच्या पुढे जोर पकडला. ही रॅली नानोरी-सोनोरी मार्गे ब्राम्हणवाडा थडी, घाटलाडकी, शिरजगाव कसबा, करजगाव, खरपी, कोठारा, बैतूल स्टॉप मार्गे परतवाडा शहरात दाखल झाली.

Maharashtra Election 2019 ; Bachchu Kadu demonstrates power at Chandur Bazaar | Maharashtra Election 2019 ; बच्चू कडू यांचे चांदूरबाजार येथे शक्तिप्रदर्शन

Maharashtra Election 2019 ; बच्चू कडू यांचे चांदूरबाजार येथे शक्तिप्रदर्शन

googlenewsNext
ठळक मुद्देमतदारांशी साधला संवाद : रॅलीद्वारे केला प्रचार

लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा/चांदूरबाजार : अचलपूर विधानसभा मतदारसंघातील प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार बच्चू कडू यांनी शनिवारी शक्तिप्रदर्शन केले. यावेळी प्रचार रॅली काढून त्यांनी मतदारांशी संवाद साधला. या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात दुचाकी, चारचाकीतून नागरिकांनी सहभाग घेतला.
चांदूरबाजार शहरातून निघालेल्या या प्रचार रॅलीने नानोरी, सोनोरीच्या पुढे जोर पकडला. ही रॅली नानोरी-सोनोरी मार्गे ब्राम्हणवाडा थडी, घाटलाडकी, शिरजगाव कसबा, करजगाव, खरपी, कोठारा, बैतूल स्टॉप मार्गे परतवाडा शहरात दाखल झाली. पुढे परतवाडा शहरातून गुजरी बाजार, सदर बाजार, मिश्रा लाइन, टिळक चौक, पेन्शनपुरा, नृसिंह महाराज मंदिर, एसटी डेपो, विदर्भ मिल, अचलपूर तहसील, टक्कर चौक, देवडी, बुद्धेखा चौकातून गांधी पुलावर दाखल झाली. गांधी पुलावर प्रचारसभा घेऊन या प्रचार रॅलीची सांगता केली गेली.
प्रचार रॅलीत अचलपूर-परतवाडा शहरातील व्यापारी मंडळी, उद्योजक यांच्यासह प्रहारचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि बच्चू कडूंचे समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. गांधी पुलावरील रॅलीच्या सांगताप्रसंगी बच्चू कडू यांनी उपस्थितांशी संवाद साधत विकासकामांसह समाजकारणाचा लेखाजोखाही त्यांनी याप्रसंगी मांडला. बच्चू कडू यांनी प्राचाराच्या १२ दिवसांमध्ये संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला तसेच प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शनिवारी अचलपूर, परतवाडा, चांदूर बाजार या तिन्ही प्रमुख शहरांमध्ये रॅली काढून मतदारराजाचे आशीर्वाद घेतले.

Web Title: Maharashtra Election 2019 ; Bachchu Kadu demonstrates power at Chandur Bazaar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.