शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
3
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
4
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
8
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
9
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
10
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
11
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
12
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
13
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
14
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
15
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
16
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
17
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
18
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
19
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
20
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 ; रक्तदान करून दाखल केली बच्चू कडूंनी उमेदवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 06:00 IST

रक्तदान केल्यानंतर आमदार बच्चू कडू, त्यांच्या सहधर्मचारिणी नयना कडू यांच्यासह शेकडो कार्यकर्ते स्वयंस्फूर्तीने अचलपूर एसडीओ कार्यालयाबाहेर आपआपल्या वाहनांनी दाखल झालेत. कार्यकर्त्यांच्या गळ्यात प्रहारची टोपी आणि प्रहारचा दुपट्टाही होता.

ठळक मुद्दे३५० प्रहारींचे रक्तदान : आईचा घेतला आशीर्वाद; शक्तिप्रदर्शनास फाटा

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : आईचा आशीर्वाद घेऊन रक्तदानानंतर आमदार बच्चू कडू यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर केला. प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने गुलाबबाबा पॅलेसमध्ये रक्तदान आयोजित करण्यात आले होते. यात प्रहारच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली. रक्तदानाकरिता ७०० ते ८०० कार्यकर्ते तयार होते. यातील ३५० कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी रक्तदान केले.रक्तदान केल्यानंतर आमदार बच्चू कडू, त्यांच्या सहधर्मचारिणी नयना कडू यांच्यासह शेकडो कार्यकर्ते स्वयंस्फूर्तीने अचलपूर एसडीओ कार्यालयाबाहेर आपआपल्या वाहनांनी दाखल झालेत. कार्यकर्त्यांच्या गळ्यात प्रहारची टोपी आणि प्रहारचा दुपट्टाही होता. आमदार बच्चू कडू, नयना कडू, डॉ. सुरेंद्र बरडियांसह उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरिता निवडणूक निर्णय अधिकारी संदीपकुमार अपार यांच्यासमक्ष हजर झालेत. तेथे त्यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला. प्रहारचे बल्लू जवंजाळ, प्रवीण पाटील, संजय तट्टे, बंटी ककरानिया, बंटी उपाध्याय, सतीश व्यास, महेंद्र अग्रवाल, संतोष नरेडी, बाळासाहेब खडसे, अंकुश जवंजाळ, मनोज नंदवंशी, संतोष नरेडी, सुनील अग्रवाल यांच्यासह अचलपूर व चांदूर बाजार तालुक्यातील शेकडो लोक एसडीओ कार्यालयाबाहेर निर्धारित सीमेवर उभे होते. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस व आमदार बच्चू कडू उमेदवारी अर्ज दाखल करणार म्हणून एसडीओ कार्यालय परिसरात पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली होती.शहरातील परिस्थिती बघता आमदार बच्चू कडू यांनी शक्तिप्रदर्शन न करता आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. गुरुवार, ३ आॅक्टोबरलाही आमदार बच्चू कडू यांच्यावतीने भास्कर मासोदकर यांनी बच्चू कडूंचा उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाºयांकडे सादर केला होता.

टॅग्स :achalpur-acअचलपूरBachhu Kaduबच्चू कडू