शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

महा शिवपुराण कथा; कलश यात्रेदरम्यान महिला दगावली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2024 13:45 IST

परतवाड्यातील घटना: अटी-शर्तीचा भंग; आयोजकांविरुद्ध गुन्हे

लोकमत न्यूज नेटवर्क परतवाडा : पं. प्रदीप मिश्रा यांच्या महा शिवपुराण कथेच्या अनुषंगाने काढण्यात आलेल्या कलश यात्रेदरम्यान एक महिला कोसळली आणि मृत्युमुखी पडली. अन्य एक महिला गंभीर जखमी झाली आहे. रविवारी ही घटना घडली. ललिता सुभाष बाळापुरे (५८, रा. कांडली) असे मृत महिलेचे नाव आहे. महा शिवपुराण कथेनिमित्त रविवारी सकाळी साडेसहापासून कलश यात्रेला प्रारंभ झाला. यात सहभागी झालेल्या ललिता भोवळ येऊन कोसळल्या. त्यांना तत्काळ रुग्णालयात हलविले. दोन खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. तर, दुसरी महिला वाघामातालगत भोवळ येऊन रस्त्यावर कोसळली. यात ती गंभीर जखमी झाली. पण, या महिलेचे नाव कळू शकले नाही. तापमान वाढल्याने कलश यात्रेत सहभागी महिलांना पायाखाली चटके लागत होते, कथास्थळी पाण्याची व्यवस्था नसल्याने तेथील कुलर पाण्याविना उष्ण हवा फेकत होते.

परवानगी वाघामातापर्यंत, कथास्थळी नेली यात्राकलश यात्रेकरिता पोलिसांनी टिळक चौक ते वाघामाता अशी परवानगी दिली होती. सकाळी साडेसहाला सुरू झालेली कलश यात्रा नऊ वाजताच्या दरम्यान वाघामाता परिसरात पोहोचली. तिथे यात्रेचे विसर्जन अपेक्षित होते. पण, काही अतिउत्साही मंडळींनी प्रशासनाच्या अटी-शर्ती पायदळी तुडवत हजारो महिलांसह ही कलश यात्रा कथास्थळी नेली.

पोलिसांत गुन्हा नोंदकलश यात्रेचे नियोजित अंतर वाढल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला, अंजनगाव रोडवरील वाहतूक जाम झाली. दरम्यानही काही महिला चक्कर येऊन जमिनीवर कोसळल्या. त्यामुळे परतवाडा पोलिसांनी ओम जयस्वाल, प्रकाश जयस्वाल, अमोल जयस्वाल, अजय मोरयांविरुद्ध गुन्हे दाखल केल्याची माहिती परतवाड्याचे ठाणेदार संदीप चव्हान यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयाकडून या कार्यक्रमाला परवानगी देण्यात आली आहे. व्यवस्था आणि महिलेच्या मृत्यूविषयी माहिती नाही. माहिती घेतली जाईल.- डॉ. संजय गरकल, तहसीलदार, अचलपूर

कलश यात्रेदरम्यान अटी- शर्तीचा भंग केल्यावरून चौघांविरुद्ध गुन्हे दाखल केले, कलश यात्रा पहाटेच निघाली होती. मात्र गर्दीमुळे पुढे तिला उशिर झाला.- विशाल आनंद, पोलिस अधीक्षक,

खंडित वीजपुरवठा, अपुरे व्होल्टेज यामुळे पाणी व्यवस्थेत व्यत्यय येत होता. पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. गैरसोय होणार नाही.- प्रकाश जयस्वाल, परतवाडा

 

टॅग्स :AmravatiअमरावतीAccidentअपघात