अमरावती येथे लव्ह जिहाद, धर्मांतरविरोधी भव्य मोर्चा
By गणेश वासनिक | Updated: December 18, 2022 14:18 IST2022-12-18T14:16:36+5:302022-12-18T14:18:04+5:30
लव्ह जिहाद विरोधी कायदा व्हावा, या मागणीसाठी विविध हिंदुत्ववादी धार्मिक व सामाजिक संघटनाच्या वतीने आयोजित मोर्चात खासदार नवनीत रवी राणा सहभागी झाल्या आहेत.

अमरावती येथे लव्ह जिहाद, धर्मांतरविरोधी भव्य मोर्चा
अमरावती - विविध हिंदुत्ववादी संघटनाच्यावतीने लव्ह जिहाद, धर्मांतरविरोधी रविवारी अमरावती येथे भव्य मोर्चा काढण्यात आला. राजकमल चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयपर्यत निघालेल्या या मोर्चात खासदार नवनीत राणा, आमदार प्रवीण पोटे पाटील यासह भाजप, विश्व हिंदु परिषद, बजरंग दल, दुर्गा वाहिनी आदींचे कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, देशातील सर्व राज्यांमध्ये लव्ह जिहाद रोखण्यासाठी कायदा पारित व्हावा, यासाठी खासदार नवनीत रवी राणा लोकसभेत आवाज उचलणार असे जाहीर केले. लव्ह जिहाद विरोधी कायदा व्हावा, या मागणीसाठी विविध हिंदुत्ववादी धार्मिक व सामाजिक संघटनाच्या वतीने आयोजित मोर्चात खासदार नवनीत रवी राणा सहभागी झाल्या आहेत.
हिंदुत्व के सन्मान मे-सौ नवनीत रवी राणा मैदान मे,हिंदू धर्म रक्षण व संस्कृती संवर्धनासाठी आज अमरावती मध्ये आयोजित सकल हिंदू धर्म बंधू भगिनींच्या वतीने आयोजित हिंदू आक्रोश मोर्चा मध्ये खासदार नवनीत रवी राणा यांनी सक्रिय सहभाग घेऊन आपण धर्मप्रेमी असल्याचे दाखवून दिले.
काही विशिष्ट समाजातील तरुण हिंदू मुलींना आपल्या जाळ्यात अडकवून जबरदस्तीने त्यांच्यासोबत विवाह करतात,त्यांचा छळ करून त्यांचे आयुष्य उध्वस्त करतात, या लव्ह जिहाद ला कायमचा आळा बसावा यासाठी कठोर कायद्याची गरज असल्याची मागणी खासदार राणा म्हणाल्या.
हातात भगवा ध्वज घेऊन मोर्चात अग्रभागी चालणाऱ्या दृढनिश्चयी खासदार नवनीत राणा या सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या,संसदेचे अधिवेशन सुरू असतानाही केवळ या मोर्चात सहभागी होण्यासाठी त्या दिल्लीवरून अमरावतीत आल्या होत्या. जय श्रीराम-जय हनुमान, जो हिंदुत्व की बात करेंगा -वो ही इस देश पर राज करेंगा अशा घोषणाबाजीने परिसर दुमदुमला होता.