शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
2
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
3
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
4
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
5
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
6
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
7
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
8
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
9
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
10
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
11
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
12
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
13
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
14
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
15
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
16
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
17
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
18
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
19
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
20
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत

Lok Sabha Election 2019; गोपगव्हाणला मतदानाचा टक्का शून्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 1:03 AM

बडनेरा विधानसभा मतदारसंघातील गोपगव्हाण येथील ग्रामस्थांनी गुरुवारी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घातला. निम्न पेढी प्रकल्पग्रस्तांना वाढीव मोबदला देण्याची मागणी प्रशासनाने मान्य केली नाही. त्यामुळे ५३६ मतदारांपैकी एकानेही मतदान केले नाही, हे विशेष.

ठळक मुद्देप्रकल्पग्रस्तांना हवा वाढीव मोबदला

अमरावती/बडनेरा : बडनेरा विधानसभा मतदारसंघातील गोपगव्हाण येथील ग्रामस्थांनी गुरुवारी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घातला. निम्न पेढी प्रकल्पग्रस्तांना वाढीव मोबदला देण्याची मागणी प्रशासनाने मान्य केली नाही. त्यामुळे ५३६ मतदारांपैकी एकानेही मतदान केले नाही, हे विशेष.गोपगव्हाण हे गाव बडनेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येते. जिल्हा निवडणूक कार्यालयाने गोपगव्हाण येथील जिल्हा परिषद शाळेत मतदान केंद्र निश्चित केले. त्यानुसार मतदान अधिकारी, कर्मचाऱ्यांनी निवडणूक प्रक्रियेची तयारीसुद्धा केली. तथापि, सकाळी ७ वाजेपासून प्रारंभ झालेल्या दुपारी ३ वाजेपर्यंत एकाही मतदाराने मतदान केले नव्हते. ‘आधी प्रकल्पगस्तांचा वाढीव मोबदला, नंतर मतदान’ अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतल्याने जिल्हा प्रशासन हतबल झाले. गोपगव्हाण येथील ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार घातल्याने बडनेरा पोलीस निरीक्षक शरद कुळकर्णी यांच्या नेतृत्वात पोलीस यंत्रणा लक्ष ठेवून होते. गोपगव्हाण येथील बहुतांश शेतकऱ्यांची निम्न पेढी प्रकल्पात जमीन गेली आहे. मात्र, अतिशय कमी दराने शासनाने भूसंपादन केले, असा आरोप प्रकल्पग्रस्तांचा आहे. त्यामुळे शासन, प्रशासनाने जमिनीचा वाढीव मोबदला द्यावा, यासाठी अनेकदा जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा केला. आंदोलन, मोर्चेदेखील काढण्यात आले. मात्र, शासन, प्रशासनाने गोपगव्हाण येथील प्रकल्पग्रस्तांची हाक ऐकली नाही. त्यामुळे लोकशाही मार्गाने लोकसभा निवडणुकीत बहिष्काराचा निर्णय संपूर्ण ग्रामस्थांनी घेतला आहे. लोकसभा निवडणूक जाहीर होताच ग्रामस्थांनी वाढीव मोबदला नाही, तर मत नाही,असा निर्णय एकमताने घेतला होता.जिल्हा निवडणूक विभागाने गोपगव्हाण येथील जिल्हा परिषद शाळेत मतदान केंद्र निश्चित केले होते. मात्र, सकाळी ७ वाजेपासून एकाही मतदाराने मतदान केले नाही. निवडणूक बहिष्कार कायम ठेवला होता.- अतुल पेढेकरपोलीस पाटील, गोपगव्हाण

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकamravati-pcअमरावतीMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019