शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
2
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
3
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
4
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
5
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
6
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
7
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
8
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
9
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
10
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
11
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
12
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
13
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
14
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
15
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
16
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
17
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
18
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
19
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
20
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य

Lok Sabha Election 2019; शांतता भंग केल्यास खैर नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2019 11:43 PM

लोकसभा निवडणुकीत कायदा व सुव्यवस्थेला बांधा पोहोचवून शांतता भंग करणाऱ्या गुंड प्रवृत्तींना कदापि सोडणार नाही, असा इशारा देत ही निवडणुक शांततेत पार पडण्यासाठी प्रयत्नशिल असल्याची ग्वाही पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांनी दिली. निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्यात आले आहे. गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी सर्वपरिने प्रयत्न सुरु आहेत.

ठळक मुद्देपोलीस आयुक्त : कायदा, सुव्यवस्थेसाठी यंत्रणा सज्ज

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : लोकसभा निवडणुकीत कायदा व सुव्यवस्थेला बांधा पोहोचवून शांतता भंग करणाऱ्या गुंड प्रवृत्तींना कदापि सोडणार नाही, असा इशारा देत ही निवडणुक शांततेत पार पडण्यासाठी प्रयत्नशिल असल्याची ग्वाही पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांनी दिली. निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्यात आले आहे. गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी सर्वपरिने प्रयत्न सुरु आहेत.अमरावती लोकसभा मतदार संघासाठी १८ एप्रिल रोजी मतदान होईल. त्यामुळे आता दिग्गज उमेदवारांच्या प्रचाराला जोर आला आहे. वरिष्ठ नेत्यांच्या जाहिर सभा, बैठका व प्रचारात उमेदवार तथा त्यांची कार्यकर्ते मग्न आहेत. अशा स्थितीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस यंत्रणाही सज्ज झाली आहे. निवडणूक शांततेत पार पाडण्याचे आव्हान असले, तरी पूर्व नियोजनाने हे आव्हान पेलण्यास पोलीस यंत्रणा तयार असल्याचा विश्वास पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांनी दाखविला आहे. त्याअनुषंगाने शहर आयुक्तालयाने धडक मोहिम राबवून गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत.मुसक्या आवळल्या; गुन्हेगार वठणीवरनिवडणूक शांततेत पार पडावी, यासाठी पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांनी गुन्हेगारांविरोधात कारवाईचा सपाटा सुरु केला. या कारवाईत ९२ सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले. तर ३ गुन्हेगारांवर एमपीडीए कायद्यान्वये कारवाई करण्यात आली. रेकॉर्डवरील ९३० गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली. आर्म अ‍ॅक्टच्या गुन्ह्यात २ अग्निशस्त्र व शस्त्र बाळगणाºया १४ आरोपींविरुध्द कारवाई करण्यात आली. दहाही पोलीस ठाण्याच्या हद्दीत रूट मार्च काढण्यात आला. शहरातील आठ सिमांवर नाकाबंदी करून वाहनांची नियमित तपासणी व कोम्बिंग आॅपरेशनसुद्धा राबविण्यात आले. याशिवाय मतदानाच्या दिवशी शेकडो गुन्हेगारांना डिटेन सुध्दा केले जाणार आहे.संवेदनशील केंद्रावर अतिरिक्त ताफाशहर पोलीस आयुक्तालय हद्दीत २६० इमारतींमध्ये ७६६ मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. ५८ इमारतींमधील संवेदनशिल १७७ मतदान केंद्रांवर पोलीसांचा अतिरिक्त ताफा राहिल.संवेदनशील केंद्रांना भेटीशहरातील १७७ संवेदनशील केंद्रांना पोलीस आयुक्त संजय बावीस्कर, उपायुक्त यशवंत सोळंके, शशिकांत सातव यांच्यासह सहाय्यक पोलीस आयुक्त व संबंधित पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी भेटी दिल्या आहेत.महिलांच्या केंद्रावर विशेष लक्षमहिलांसाठी स्वतंत्र ११ केंद्रांवर महिला अधिकारी व कर्मचाºयांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. महिला मतदारांसाठी अमरावतीत ५ व बडनेरामध्ये ६ अशी ११ स्वतंत्र केंदे्र राहतील.कारवाईचा सपाटानिवडणुकीत अवैध दारु विक्रीला उधाण येते, दारु पिऊन अनेक जण वादविवाद करतात. अपघात घडतात. अशा कृत्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी आतापर्यंत १३५ अवैध दारु विक्रेत्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे.अशी आहे पोलिसांची तयारीमतदानाच्या दिवशी शहरातील विविध मतदान केंद्रात व बाहेर १४७ पोलीस अधिकारी, १ हजार ८०० कर्मचारी, ५०० होमगार्ड यांच्यासह एसआरपीएफच्या २ व सीआरपीएफची २ कंपन्या तैनात राहणार आहे. पोलिसांचे खुपीया विभागाही गोपनिय माहिती काढण्यासाठी फिरणार आहेत. सीपी, डीसीपी, एसीपी व पीआसह पोलीस शिपायापर्यंत सर्वच यंत्रणा निवडणुकीवर लक्ष ठेवणार आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकamravati-pcअमरावती