‘तिच्या’ प्रसंगावधानामुळे टळली प्राणहानी
By Admin | Updated: January 7, 2016 00:29 IST2016-01-07T00:29:28+5:302016-01-07T00:29:28+5:30
नववर्षाच्या स्वागतानंतर लॉनजवळील एका अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत लाखोंचे घरगुती साहित्य जळून खाक झाले.

‘तिच्या’ प्रसंगावधानामुळे टळली प्राणहानी
नववर्षाच्या पहिल्या दिवशीची घटना : शॉर्ट सर्किटमुळे लागली आग, लाखोंचे साहित्य भस्मसात
अमरावती : नववर्षाच्या स्वागतानंतर लॉनजवळील एका अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत लाखोंचे घरगुती साहित्य जळून खाक झाले. आग लागल्याचे सर्वप्रथम फ्लॅटमध्ये राहणाऱ्या बालिकेच्या लक्षात येताच तिने कुटुंबीयांना सूचना देऊन सर्वाना बाहेर निघण्याचा मार्ग दाखविल्याने प्राणहानी टळली.
गाडगेनगर पोलीस ठाण्यांतर्गत े६ी लॉन मागील परिसरात जगदंबा अपार्टमेंटमध्ये एकुण सहा प्लॅट असून तेथील तिसऱ्या माळ्यावरील एका फ्लॅटमध्ये सुहास कृष्णराव देशमुख यांचे कुटुंबीय राहतात. ३१ डिसेंबरपूर्वी सुहास देशमुख हे चाळीसगाव येथे गेले होते. त्यांच्या घरी पत्नी लक्ष्मी, त्यांची मुलगी स्वरांजली, मुलगा स्मित व वडील कृष्णराव उपस्थित होते. रात्री १२ वाजतानंतर नवर्षास सुरुवात झाल्यानंतर सर्व कुटुंबीय निवांतपणे घरात आपआपल्या ठिकाणी झोपले होते.
मध्यरात्री १.३० वाजताच्या सुमारास अचालक सिलिंगचा एक लाईट गरम होऊन सोफ्यावर पडला व आग लागली. ही बाब स्वरांजलीच्या लक्षात येताच तिने तत्काळ आजोबा, आई व भावाला झोपेतून उठवले. सर्वांना घेऊन जिन्यातील मार्गाने दुसऱ्या माळ्यावर सुखरुप उतरविले. दुसऱ्या माळ्यावर राहणारे धर्माळे यांना उठवून मदत मागितली.
धर्माळे यांनी तत्काळ अग्निशमन विभाग व गाडगेनगर पोलिसांना फोनवर माहिती कळविली. काही वेळात अग्निशमन विभागाचे कर्मचारी पाण्याचे बंब घेऊन अर्पाटमेंटमध्ये पोहोचले व त्यांनी पहाटे ३ वाजेपर्यत आगीवर नियंत्रण मिळविले.
आगीमुळे सुहास देशमुख यांच्या घरातील महागडा सोफा, इलेक्ट्रानिक्स वस्तू व फर्निचर असा लाखोंचा माल जळून खाक झाला आहे.
सुहास यांच्या मुलीने हिंमत व प्रसंगावधान राखून कुटुंबीयांना घराबाहेर निघण्याचा योग्य मार्ग दाखविल्याने मोठी घटना टळळी आहे. (प्रतिनिधी)