शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
4
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
5
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
6
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
7
बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
8
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
9
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
10
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
11
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
12
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
13
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
14
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
15
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
16
इराणने लवकर शहाणे व्हावे...; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
17
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
18
एकीची मेहंदीही निघाली नव्हती, तर दुसरीचे मेमध्ये होते लग्न, पण काळाने घातला घाला
19
मे डे... मे डे... मे डे...! हे उद्योगाचे आर्थिक गाऱ्हाणे नाही तर एका मोठ्या राष्ट्रीय संकटाची नांदी
20
‘मातोश्री’ पुन्हा एकदा पिताश्रीच्या मार्गाने; ‘रिमोट कंट्रोल’च्या भूमिकेत पक्षाला गतवैभव मिळेल?
Daily Top 2Weekly Top 5

१०० क्विंटलवर तूर विकणाऱ्यांची मागविली यादी

By admin | Updated: April 14, 2017 00:07 IST

शेतकऱ्यांच्या आडून तुरीची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांवर जिल्हा प्रशासनाने चांगलाच फास आवळला आहे.

व्यापाऱ्यांभोवती आवळला फास : सर्व १० केंद्रांना जिल्हाधिकाऱ्यांचे आदेशअमरावती : शेतकऱ्यांच्या आडून तुरीची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांवर जिल्हा प्रशासनाने चांगलाच फास आवळला आहे. आतापर्यंत शासकीय तूर खरेदी केंद्रावर एकाच सातबाऱ्यावर १०० क्विंटलपेक्षा अधिक तुरीची विक्री करणाऱ्या शेतकरी कम व्यापाऱ्याच्या याद्या जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ मागविल्या आहेत.व्यापाऱ्यांद्वारा खुल्या बाजारात चार हजार रूपये क्विंटलने शेतकऱ्यांची तूूर विकत घेऊन शासकीय खरेदी केंद्रावर ५०५० रूपये दराने ती विकण्याचा गोरखधंदा व्यापाऱ्यांनी सुरू केला आहे. याविषयीच्या तक्रारी पालकमंत्र्यांसह राज्याच्या मुुख्यमंत्र्यांना प्राप्त झाल्याने शासनाने ही बाब गांभीर्याने घेतली आहे. जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त व पोलीस अधिक्षकांना त्यांच्या अधिनस्थ यंत्रणेद्वारे व्यापाऱ्यांना हुडकून काढण्याचे निर्देश दिलेत. बुधवारी अमरावती बाजार समितीमध्ये असलेल्या शासकीय तूर खरेदी केंद्रावर पथकाने पाहणी केल्याची माहिती आहे. प्रभारी जिल्हाधिकारी के. पी. परदेशी यांनी शासकीय तूर खरेदी केंद्रावर १०० क्विंटलपेक्षा अधिक तुरीची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांच्या याद्या मागविल्या आहेत. संबंधित शेतकऱ्याकडे असलेल्या सातबाऱ्यावरील तुरीचे क्षेत्र व त्याची सरासरी उत्पादकता याआधारे आता शेतकऱ्यांच्या नावाआड तूर विकणाऱ्या व्यापाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाईचा फास आवळला जाणार आहे. (प्रतिनिधी)