चार मजली अपार्टमेंटच्या टेरेसवर वीज कोसळली, अमरावतीतील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2024 18:27 IST2024-07-14T18:26:03+5:302024-07-14T18:27:45+5:30
वीज कोसळतानाचा घटनाक्रम व प्रकाश तेथील सीसीटिव्हीत कैद झाला आहे...

चार मजली अपार्टमेंटच्या टेरेसवर वीज कोसळली, अमरावतीतील घटना
अमरावती : राजापेठ भागातील केडियानगरस्थित दत्तसाईराज अपार्टमेंट या चार मजली इमारतीच्या टेरेसवर रविवारी दुपारी १.३८ च्या सुमारास वीज कोसळली. वीज टेरेसच्या कोपऱ्यावर कोसळल्याने कंपाऊंडच्या भिंतीला तडा गेला. तसेच एक मोठा काॅंक्रीटचा तुकडा तूटून खाली पडला. वीज कोसळतानाचा घटनाक्रम व प्रकाश तेथील सीसीटिव्हीत कैद झाला आहे.
शहरात दुपारी एक ते दिडच्या सुमारास मुसळधार पावसाला सुरूवात झाली. विजांचा प्रचंड कडकडाट सुरू झाला. प्रचंड मोठा आवाज करत एक विद्युल्लता दत्तसाईराज अपार्टमेंटच्या टेरेसवर कोसळली. त्यामुळे अपार्टमेंटमधील लिफ्ट निकामी झाली. तसेच तेथील रहिवासी संदीप शेंडे व भंवरलाल जाखड यांच्या घरचे पंखे निकामी झाले. तसेच लगतच्या एका घरातील एलईडी टिव्ही देखील निकामी झाली.