निर्भयपणे मतदान करून लोकशाही बलशाली करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 05:34 AM2021-02-05T05:34:49+5:302021-02-05T05:34:49+5:30

अमरावती : लोकशाहीवर निष्ठा व्यक्त करणारी कृती म्हणजे मतदारांनी मतदानाचा हक्क बजावणे होय. निर्भयपणे मतदान प्रक्रियेत ...

Let's strengthen democracy by voting fearlessly | निर्भयपणे मतदान करून लोकशाही बलशाली करू

निर्भयपणे मतदान करून लोकशाही बलशाली करू

Next

अमरावती : लोकशाहीवर निष्ठा व्यक्त करणारी कृती म्हणजे मतदारांनी मतदानाचा हक्क बजावणे होय. निर्भयपणे मतदान प्रक्रियेत सहभागी होऊन आपण लोकशाही अधिक बलशाली बनवू. त्यामुळे कुणाच्याही दबावाखाली न येता, आमिषाला बळी न पडता मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी नवमतदार युवक-युवतींना केले.

राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली उपस्थित सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना लोकशाहीवर निष्ठा ठेवण्याची शपथ देण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे, उपजिल्हाधिकारी निवडणूक वर्षा पवार, उपविभागीय अधिकारी उदयसिंह राजपूत, तहसीलदार संतोष काकडे, नायब तहसिलदार सुनिल रासेकर, संदीप टांक, प्रवीण देशमुख, दिनेश बढीये यांच्यासह बडनेरा मतदार संघाचे मतदान केंद्र अधिकारी उपस्थित होते.

नवीन मतदारांना ओळखपत्राचे वाटप

निवडणूक प्रक्रियेत चोखपणे आपली जबाबदारी पार पाडऱ्यांना मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र व गुलाबपुष्प देऊन जिल्हाधिकाऱ्यांनी सत्कार केला. बडनेरा मतदार संघातील सागर अठोर, सरोज शेगोकार, अमित घिमे, सतीश शिरसाठ, वैशाली भोरे व मोहम्मद सलीम या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचा जिल्हाधिकाऱ्यांनी प्रमाणपत्र देऊन गौरव केला.

बॉक्स

युवकांना ओळखपत्रांचे वाटप

१८ वर्षावरील मतदान नोंदणी केलेल्या युवक-युवतींना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ओळखपत्र वितरित करण्यात आले व गुलाबपुष्प देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये अबरार खान अजीज खान, सैय्यद नाजीम, रूपेश शेंडे, शीतल मेश्राम, दादाराव शिरसाठ, शुभम सोंळके, केताली माहोरे, नंदिनी खाडे, आनंद गवळी, राहुल ढवळे, मोनिका म्हात्रे, समीश्रा टाले यांना मतदान ओळखपत्राचे वाटप करण्यात आले.

Web Title: Let's strengthen democracy by voting fearlessly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.