शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
2
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
3
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
4
"मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
5
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
6
विराट-अनुष्काचा मुलगा 'अकाय' कसा दिसतो? टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला...
7
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
8
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
9
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
10
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
11
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
12
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
13
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
14
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
15
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
16
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
17
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
18
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
19
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
20
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद

जात वैधता प्रमाणपत्राऐवजी आता हमीपत्र ग्राह्य; ४,४१८ ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक प्रक्रिया सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2018 4:09 PM

राज्यात सध्या सुरू असलेल्या ३१७ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व ४,१०१ ग्रापंचा पोटनिवडणुकांमध्ये राखीव प्रभागांतील उमेदवारांना अर्जासोबत जात वैधता प्रमाणपत्र जोडणे सक्तीचे करण्यात आले आहे. मात्र, मंगळवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत ३० जून २०१९ च्या निवडणुकीपर्यंत जातवैधता प्रमाणपत्राऐवजी हमीपत्र ग्राह्य धरण्याचा ठराव घेण्यात आला.

अमरावती : राज्यात सध्या सुरू असलेल्या ३१७ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व ४,१०१ ग्राम पंचायत पोटनिवडणुकांमध्ये राखीव प्रभागांतील उमेदवारांना अर्जासोबत जात वैधता प्रमाणपत्र जोडणे सक्तीचे करण्यात आले आहे. मात्र, मंगळवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत ३० जून २०१९ च्या निवडणुकीपर्यंत जातवैधता प्रमाणपत्राऐवजी हमीपत्र ग्राह्य धरण्याचा ठराव घेण्यात आला. त्यामुळे  आयोगाद्वारा बुधवारपासून हमीपत्र स्वीकारण्याचे आदेश सर्व जिल्हाधिका-यांना दिले. यामुळे राखीव प्रभागात निवडणूक लढविणा-या उमेदवारांना दिलासा मिळाला.राज्यात सध्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व पोटनिवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये १० फेब्रुवारीपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. यासाठी राज्य निवडणूक आयोगाने उमेदवारी अर्ज दाखल करताना राखीव प्रभागांतील उमेदवारांना उमेदवारी अर्जासोबत हमीपत्र जोडणे सक्तीचे केले होते. ग्रामविकास विभागाकडून ३१ डिसेंबर २०१७ नंतर मुदतवाढ न दिल्यामुळे हमीपत्राऐवजी जातवैधता प्रमाणपत्र घेण्यात यावे, असे आयोगाने स्पष्ट केले.निवडणूक कार्यक्रमानुसार ५ फेब्रुुवारीपासून उमेदवारी अर्ज आॅनलाईन प्रक्रियेला सुरूवात झाली. ग्रामविकास विभागाद्वारा या निर्णयाविषयी ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत मुदतवाढ द्यावी, याविषयीचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर करण्यात येणार असल्याचे आयोगाने मंगळवारी सर्व जिल्हाधिका-यांना स्पष्ट केले. दरम्यान ग्रामपंचायत निवडणुकीत अनुसूचित जाती, अनु. जमाती. नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी जागा आरक्षित असल्याने या उमेदवारांवर अन्याय होऊ नये यासाठी जातवैधता पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यास ३० जून २०१९ पर्यंत होणा-या निवडणुकांसाठी मुदतवाढ देण्यात आली व महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमात सुधारणा करण्यास मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार आयोगाने बुधवारी सर्व जिल्हाधिका-यांना पत्र जारी करून राखीव प्रभागातील उमेदवारांच्या अर्जासोबत हमीपत्र स्वीकारता येईल, असे स्पष्ट केले. उमेदवारांना मात्र विजयी झाल्याच्या सहा महिन्यांच्या आत जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक केले आहे. अन्यथा निवड अनर्ह ठरविण्यात येणार आहे.

आॅनलाईन प्रक्रियेने उमेदवार त्रस्तउमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला ५ फेब्रुवारीपासून सुरूवात झाली. यावेळी आयोगाने निवडणुकीच्या सर्व टप्प्याची प्रक्रिया आॅनलाईन केलेली आहे. उमेदवारी अर्जासह शपथपत्र सादरीकरणाचे एक दिवसपूर्व हा निर्णय घेण्यात आल्यामुळे इच्छुक उमेदवारांची तारांबळ उडाली, दरम्यान आयोगाचे संकेतस्थळ अनेकदा बंद राहत असल्याने व दुर्गम भागात इंटरनेट सेवेचा बोजवारा उडाल्याचे बहुतांश जिल्ह्यात तिस-या दिवशीही उमेदवारी अर्ज निरंक आहेत.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतAmravatiअमरावती