शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
2
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
3
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
4
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
5
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
6
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
7
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
8
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
9
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
10
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
11
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
12
आलिशान गाडी अन् ५५ लाख, 'मॅडम कलेक्टर'चा पर्दाफाश; नोकरीच्या नावाखाली तरुणांना फसवलं
13
Watermelon Price: मुंबईतील 'त्या' घटनेनंतर कलिंगडाचे दर कोसळले, आता किती रुपयांना मिळतंय?
14
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
15
तब्बल ४० तास हृदयाची धडधड होती बंद, तरीही जिवंत राहिली ही व्यक्ती, चमत्कार की...
16
वहिनी अश्विनी देशमुख यांच्या पराभवानंतर धनंजय देशमुख स्पष्टच बोलले; म्हणाले, “संतोष अण्णा...”
17
Gold Silver Rate 29 April: सोन्या-चांदीच्या दरात बदल; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
18
नृसिंह जयंती २०२६: गुरुवारी आलाय खास योग; बाधा मुक्तीसाठी करा 'हळदीचा' हा प्रभावी उपाय!
19
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
20
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
Daily Top 2Weekly Top 5

नगरपालिका सदस्यांची प्रशिक्षण वर्गाला पाठ

By admin | Updated: March 2, 2015 00:33 IST

नगरविकास मंत्रालय व नगर परिषद प्रशासन संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने अमरावती येथे विभागीय नागरी आणि पर्यावरण संशोधन केंद्र व अखिल भारतीय ...

अंजनगाव सुर्जी : नगरविकास मंत्रालय व नगर परिषद प्रशासन संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने अमरावती येथे विभागीय नागरी आणि पर्यावरण संशोधन केंद्र व अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थांनी दोन दिवस नगरसेवकांकरिता विशेष प्रशिक्षण आयोजित केले होते. यात प्रवासभत्ता वगळता भोजन व निवासी व्यवस्था केली होती. जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांच्या १८० नगरसेवकांपैकी फक्त ५० नगरसेवक उपस्थित होते.अंजनगावचे नगराध्यक्ष हनिफाबी व भाजपाच्या नगरसेविका सुनीता मुरकुटे हे प्रशिक्षणात उपस्थित होते. प्रशासकीय कामकाज व राजकीय समज-गैरसमज दूर करणाऱ्या या प्रशिक्षणाकडे नगरसेवकांनी केले. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, नगरप्रशासनाचे उपायुक्त, स्थानिक स्वराज्य संस्थांचे अभ्यासक व जिल्हा न.प.चे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पालिका अधिनियमांतर्गत कलमे, नगरसेवकांची भूमिका व जबाबदारी, राज्य सरकारची धोरणे, नगरपालिकांचे अंदाजपत्रक, वित्तीय व्यवस्थापन, उत्पन्नाचे स्त्रोत आदींबाबत महत्त्वपूर्ण प्रशिक्षण दिले. सोबतच सभागृहातील कामकाजाचे नियम, शहर स्वच्छता आराखडा, उत्तम प्रशासन व नागरिकांची सनद, महिलांच्या हक्कासाठी जेंडर बजेट ही नवीन संकल्पना, चर्चासत्र व शंका निरसन या महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन केले. नगरसेवकांनी या प्रशिक्षणास दाखविलेली उदासीनता जिल्हा प्रशासनाच्या संशोधनाचा विषय आहे. जिल्ह्यातील बहुतांश नगरपालिकांच्या राजकीय आखाड्याचा अनुभव जिल्हा प्रशासनास वारंवार आलेला आहे. नगरपालिकेत जनतेने ज्या कामासाठी निवडून दिले ते सोडून पदासाठी मारामाऱ्या करणाऱ्या नगरसेवकांना हे प्रशिक्षण अनिवार्य करण्याची गरज आहे. जे नगरसेवक या प्रशिक्षणासाठी अनुपस्थित होत त्यांची कारणे जाणून घेणे जिल्हा प्रशासनास आवश्यक असून नगरपालिकांचा कोट्यवधी रुपयांचा निधी वादविवादामुळे खर्च न होता परत जातो. (तालुका प्रतिनिधी)